शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे भारतात वर्षभरात २५ लाख लोकांचा झाला मृत्यू; 'लान्सेट' च्या सर्वेक्षणातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 11:49 IST

भारतातील प्रदूषणाची भनायक परिस्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे.

ठळक मुद्दे भारतातील प्रदूषणाची भनायक परिस्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारीच्या माध्यमातून भारतात असणारी प्रदूषणाची परिस्थिती निदर्शनास येते आहे. २०१५ मध्ये भारतात प्रदूषणामुळे तब्बल २५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली- भारतातील प्रदूषणाची भनायक परिस्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीच्या माध्यमातून भारतात असणारी प्रदूषणाची परिस्थिती निदर्शनास येते आहे. २०१५ मध्ये भारतात प्रदूषणामुळे तब्बल २५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. वायू आणि जल प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं लान्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकाच्या अभ्यासातून समोर आलं आहे. २०१५ मध्ये जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे ९० लाख लोकांचा मृत्यू झाला. यातील २८ टक्के लोक भारतीय होते. या आकडेवारीहून देशातील प्रदूषणाची समस्या किती भीषण आहे, ते समजतं आहे. द इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

वैद्यकीय नियतकालिक ‘लान्सेट’ने जगभरातील देशांमधील प्रदूषण, त्याचा लोकांवर परिणाम आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचा अभ्यास केला. यामध्ये देशातील हवा (वायू) आणि पाणी किती प्रदूषित आहेत, याचा आढावा घेतला. हवा आणि पाणी यामधील प्रदूषण कोणत्या देशात, किती जणांच्या जीवावर त्याचा परिणाम झाला, याबद्दलची आकडेवारी नियतकालिकाने प्रसिद्ध केली आहे. यातूनही भारतातील जल आणि वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. २०१५ मध्ये भारतात, वायू प्रदूषणामुळे १८ लाखांहून अधिक जणांनी जीव गमावला. तर जल प्रदूषण जवळपास ६ लाख लोकांनी जीव गमावला. 

मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रदूषणाशी संबंधित कारणांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. औद्योगिकरणात जलद गतीने वाढ होणाऱ्या भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर, केनिया यासारख्या देशांमध्ये प्रदूषणाची समस्या तितक्याच अती जास्त प्रमाणात वाढत असल्याचं ‘लान्सेट'ने आपल्या अहवालात म्हंटलं आहे. 

२०१५ मध्ये भारतात २५ लाख लोकांचा प्रदूषणामुळे झालेल्या आजारांमुळे मृत्यू झाला. यानंतर या यादीत चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये प्रदूषणामुळे १८ लाख लोकांचा मृत्यू झाला. हृदयाचे आजार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजाराने लोकांचा मृत्यू झाला आहे. लान्सेटच्या अभ्यासात आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ४०पेक्षा जास्त प्रसिद्ध लेखकांचा सहभाग होता. जगभरात वायू प्रदूषण सर्वाधिक जीवघेणं ठरत असल्याचे या अभ्यासातून समोर आलं. वायू प्रदूषणामुळे २०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोकांनी जीव गमावला. तर जल प्रदूषणामुळे १८ लाख लोकांनी जीव गमावला.. याशिवाय कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणामुळे ८ लाख लोकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारतDeathमृत्यूHealthआरोग्य