24 dead after a bus falls into a river near a village on Kota, Rajasthan | भीषण अपघात: वऱ्हाडाची बस नदीमध्ये कोसळली; 24 जणांचा बुडून मृत्यू

भीषण अपघात: वऱ्हाडाची बस नदीमध्ये कोसळली; 24 जणांचा बुडून मृत्यू

राजस्थानमध्ये एका वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला. ही बस थेट नदीत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 30 जण प्रवास करत होते. 


हा अपघात बुंदीमधील कोटा लालसोट मेगा हाय़वेवर झाला आहे. ही बस मेज नदीमध्ये कोसळल्याने सुरुवातीला 18 जण बुडाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बचाव कार्यावेळी 24 मृत झाल्याचा आकडा समोर आला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मदत सुरू केली असून बसचा वेग जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि वऱ्हाड्यांसह बस पाण्यामध्ये कोसळली. बसमध्ये राहणारे सर्वजण कोटामध्ये राहणारे आहेत. 


वऱ्हाडींना घेऊन जाणारी ही बस कोटाहून मायरा जात होती. या दुर्घटनेवर खासदार बेनिवाल यांनी ट्वीट करून दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना त्वरीत मदत करण्याची विनंती केली आहे.

English summary :
24 Dead, 4 Injured As Bus Taking Wedding Party Falls Off Bridge Into Mej River In Rajasthan.

Web Title: 24 dead after a bus falls into a river near a village on Kota, Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.