शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतील प्रवाशांचा २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

झोपेतील प्रवाशांचा २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास

झोपेतील प्रवाशांचा २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास
गुन्हा दाखल : संघमित्रा, समरसता एक्स्प्रेसमधील घटना
नागपूर : रेल्वे प्रवासात गाढ झोपी गेल्याचा फटका दोन प्रवाशांना बसला. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन संघमित्रा एक्स्प्रेस आणि समरसता एक्स्प्रेसमध्ये अज्ञात आरोपीने गुरुवारी त्यांचे दागिने आणि रोख असा एकूण २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे प्रवासात प्रवाशांचे दागिने, महागडे साहित्य पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे. प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरटे त्यांचे साहित्य लंपास करीत आहेत. गुरुवारी रेल्वेगाडी क्रमांक १२१५१ समरसता एक्स्प्रेसने (बी-३, ४२, ४५, ४६) संजय घुमनमल वासवानी (४०) रा. जरीपटका हे व्यावसायिक आपल्या कुटुंबासह कल्याण ते नागपूर असा प्रवास करीत होते. बडनेरा रेल्वेस्थानक येण्यापूर्वी सकाळी ८ वाजता ते झोपेतून जागे झाले. त्यांना आपल्या बर्थवर ठेवलेली हॅन्डबॅग दिसली नाही. त्यांनी इकडेतिकडे हॅन्डबॅगचा शोध घेतला, परंतु ती कुठेच आढळली नाही. त्यात सोन्याची चेन किंमत ४५ हजार, दुसरी सोन्याची चेन किंमत १७ हजार, सोन्याचा पेंडालचा सेट किंमत ३० हजार, कानातील टॉप्स किंमत १७ हजार, सोन्याच्या ३ अंगठ्या किंमत ३६ हजार, दोन मोबाईल किंमत ३५ हजार ५०० रुपये, आर्टिफिशियल ज्वेलरी किंमत १ हजार असा एकूण १ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल होता. दुसऱ्या घटनेत रेल्वेगाडी क्रमांक १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसने डॉ. सुजाता शुद्धोधन जामगडे (२६) रा. शीलानगर गिट्टीखदान या एस-१०, बर्थ ७१ वरून पाटणा ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. पहाटे ५ वाजता त्या अलाहाबाद रेल्वेस्थानक येण्यापूर्वी झोपेतून जाग्या झाल्या. त्यांना आपली हॅन्डबॅग बर्थवर दिसली नाही. त्यात सोनी कंपनीचा मोबाईल किंमत २४ हजार, सोन्याची चेन किंमत १९ हजार ५००, रोख ५ हजार असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)