शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२३... कोंढाळी

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

विहिरीत पडून पत्नीचा मृत्यू

विहिरीत पडून पत्नीचा मृत्यू
पती बचावला : कचारीसावंगा शिवारातील घटना
कोंढाळी : शेतातील विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही विहिरीत पडला. यात पत्नीचा बुडून मृत्यू झाला तर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पतीला वाचविले. ही घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचारीसावंगा शिवारात शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
आशा प्रभाकर अडागळे (६०, रा. कचारीसावंगा, ता. काटोल) असे मृत पत्नीचे नाव असून, प्रभाकर अडागळे (६५, रा. कचारीसावंगा, ता. काटोल) असे बचावलेल्या पतीचे नाव आहे. प्रभाकर अडागळे याची पत्नी आशा ही शेतात भाजी तोडण्यासाठी गेली होती. दरम्यान, ती गावालगतच्या केशव पुणेकर यांच्या शेतातील विहिरीत पडली. ही बाब लक्षात येेताच प्रभाकर यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेही विहिरीत पडले.
स्थानिक पोलीस पाटील प्रमोद मेहर यांना कळताच त्यांची कोंढाळी पोलिसांना सूचना दिली. ठाणेदार प्रदीप लांबट यांच्यासह उपनिरीक्षक सोनाली गोरे व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी प्रभाकर हा विहिरीतील मोटरपंपच्या पाईपला पकडून लटकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या मोटरपंपचे वायर कापण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रभाकरला बाहेर सुखरूप काढले. मात्र, आशाचा बुडून मृत्यू झाला. प्रभाकर हा परिसरातील शिवारात छोट्या-छोट्या चोऱ्या करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी पोलिसांसमक्ष केला. तो व त्याची पत्नी चोरी करण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडले असावे, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. आपण शेतात भाजीपाला तोडण्यासाठी आलो होतो. पत्नी विहिरीत पडली म्हणून तिला वाचविण्यासाठी आपण धावलो व विहिरीत पडलो, असे प्रभाकरने सांगितले. (वार्ताहर)
***