शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२३... पारशिवनी.... माती

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

(फोटो)

(फोटो)
नदीकाठी मातीचे अवैध उत्खनन
वीटभट्टी मालकांचा प्रताप : तामसवाडी गावाला पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता
विजय भुते ० पारशिवनी
तालुक्यातील तामसवाडी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या काठावर काही वीटभट्टी मालकांनी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून माती विटा तयार करण्यासाठी नेण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे या गावाला भविष्यात पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र, काहीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला.
तामसवाडी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विटांच्या भट्ट्या आहेत. या भट्ट्यांवर विटा तयार करण्यासाठी लागणारी माती ही याच परिसरातील वापरली जात असून, कन्हान नदीचे पाणी वापरले जाते. या परिसरात दोन वर्षांपूर्वीपर्यंत सीताफळाचे मोठे वनही होते. हल्ली या वीटभट्टी मालकांनी याच परिसरात अर्थात नदीच्या किनाऱ्यावर जेसीबीच्या मदतीने खोदकाम करून माती काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या नदीच्या काठावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
या वीटभट्टी मालकांनी मातीचे उत्खनन करण्यासाठी या परिसरात असलेले सीताफळाचं वनही तोडले आहे. शिवाय, नदीच्या काठावर असलेले मोठमोठे वृक्ष तोडण्यात आल्याने नदीचा काठ कमकुवत होत चालला आहे. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी उपसरपंच राजेश गोमकर यांच्या नेतृत्वात या संदर्भात पारशिवनीचे तहसीलदार बाळासाहेब टेळे यांच्याकडे लेखी तक्रार केली. महसूल विभागाने या तक्रारीवर काहीही कार्यवाही न केल्याने पुढे ग्रामस्थांनी रामटेकचे उपविभागीय अधिकारी (महसूल) शेखर सिंह यांनाही निवेदन दिले. मात्र, कुणीही या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिले नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या वीटभट्ट्यांवर विटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी माती डोरली शिवारातून मोठ्या प्रमाणात आणली जाते. त्यामुळे तामसवाडी - डोरली या मार्गावर ओव्हरलोड वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, एमएच-३१/सीक्यू-०७१८ क्रमांकाच्या भरधाव ट्रक दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीचा चुराडा झाला. काही दिवसांपूर्वी या मार्गावर एमएच-४०/वाय-१६१६ क्रमांकाचा ओव्हरलोड ट्रक पकडण्यात आला आणि जुजबी कारवाई करून तो सोडून देण्यात आला. अवैध खोदकामामुळे या परिसरात १५ ते २० फूट खोलीचे खड्डे तयार झाले आहे. पर्यवरणाचा ऱ्हास आणि पुराचा धोका विचारात घेता या प्रकराला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***