शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२३... कोराडी

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

(फोटो)

(फोटो)
महामार्गालगतची ११ दुकाने जमीनदोस्त
सिंचन विभागाची कारवाई : कोराडी मंदिर मार्गावरील अतिक्रमण हटविले
कोराडी : कोराडी टी पॉईंट ते मॉ जगदंबा महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या पुच्छ कालव्यालगत असलेल्या रिकाम्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण सिंचन विभागाने हटविले. यात ११ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सुरू करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोराडी टी पॉईंट ते मंदिराकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेली जागा ही सिंचन विभागाच्या अखत्यारित आहे. अनेक वर्षांपासून ही जागा रिकामी असल्याने त्यावर काही नागरिकांनी अतिक्रमण करून आपापले व्यवसाय सुरू केले होते. या जागेवर सध्या सलून, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, पानटपरी, हॉटेल्स यासह अन्य छोटीमोठी दुकाने थाटण्यात आली होती. मंदिराकडे जाणारा हा मार्ग आधीच अरुंद आहे. त्यात या मार्गालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीस मोठा अडसर निर्माण व्हायचा. येथून काही अंतरावर ऑटो स्टॅण्ड असल्यामुळे मंदिराकडून टी पॉईंटकडे येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता दिसत नव्हता. त्यामुळे तिथे अपघातांचे प्रमाणही वाढले होतेे.
सदर प्रकार नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. दरम्यान, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाने संबंधित अतिक्रमणधारकांना ती जागा खाली करून देण्यासंदर्भात पत्राद्वारे सूचनाही दिली होती. अतिक्रमणधारकांनी या पत्रातील सूचना गांभीर्याने घेतल्या नाही.
परिणामी, अतिक्रमणधारक सदर जागा सोडत नसल्याचे लक्षात येताच सिंचन विभागातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास या परिसरातील अतिक्रमण जेसीबीच्या मदतीने हटवायला सुरुवात केली. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणस्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. शिवाय, माहिती मिळताच नाना कंभाले व नगरसेवक रत्नदीप रंगारी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर कारवाईला विरोध दर्शविला. एकाच बाजूचे अतिक्रमण तोडू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी रेटून धरली. त्यामुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईमुळे अनेक तरुण बेरोजगार होणार असल्याचा युक्तिवाद रत्नदीप रंगारी यांनी केला.