कौतुकास्पद! २२ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने मरणोत्तर अवयवदानाने वाचवले ६ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:50 IST2026-01-27T15:50:17+5:302026-01-27T15:50:50+5:30

Engineering Student Organ Donation: २२ वर्षीय मुलाच्या आई-वडिलांनी कठीण प्रसंगातही धाडसी निर्णय घेतला.

22 Year Old Engineering Student Saves 6 Lives Through Organ Donation in Andhra | कौतुकास्पद! २२ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने मरणोत्तर अवयवदानाने वाचवले ६ जणांचे प्राण

कौतुकास्पद! २२ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने मरणोत्तर अवयवदानाने वाचवले ६ जणांचे प्राण

Engineering Student Organ Donation: 'मरणोत्तर अवयवदान हेच श्रेष्ठ दान' हा संदेश आंध्र प्रदेशातील एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या कृतीतून सार्थ करून दाखवला. अपघातात ब्रेन डेड (Brain Dead) घोषित झाल्यानंतर या विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला, ज्यामुळे सहा रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले. त्यामुळे त्याच्या या धाडसी निर्णयाला सलाम करण्यात येत आहे. पेरुगु अमर बाबू (Perugu Amar Babu) असे त्या तरुणाचे नाव आहे.

रस्ते अपघातात गंभीर जखमी

पेरुगु अमर बाबू हा तरुण अभियांत्रिकीचा (Engineering) विद्यार्थी होता. एका रस्ते अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्याला 'ब्रेन डेड' घोषित केले.

पालकांचा धाडसी निर्णय

आपल्या तरुण मुलाला गमावल्याचे दुःख डोंगराएवढे असतानाही, त्याच्या पालकांनी सामाजिक भान जपले. आपला मुलगा या जगातून गेला असला, तरी त्याच्या रूपाने इतरांना जीवन मिळावे, या उद्देशाने त्यांनी अवयवदानासाठी संमती दिली.

सहा जणांना जीवदान

या विद्यार्थ्याचे हृदय, यकृत (Liver), मूत्रपिंड (Kidneys) आणि डोळे दान करण्यात आले. या अवयवांच्या प्रत्यारोपणामुळे (Transplant) मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या सहा वेगवेगळ्या रुग्णांना पुनर्जन्म मिळाला. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात अवयवदानाबद्दल असलेली भीती दूर होण्यास आणि जागरूकता वाढण्यास मदत होते. या विद्यार्थ्याच्या बलिदानाने आणि त्याच्या पालकांच्या दातृत्वाने सहा जीव वाचलेच, त्यासोबत सहा कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली.

प्रशासनाने आणि संबंधित रुग्णालयाने या कुटुंबाच्या निर्णयाचे कौतुक केले असून, या तरुणाचा हा त्याग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली आहे.

Web Title : 22 वर्षीय छात्र के अंगदान से दुर्घटना के बाद छह लोगों की जान बची

Web Summary : आंध्र प्रदेश में एक 22 वर्षीय इंजीनियरिंग छात्र के अंगदान ने एक घातक दुर्घटना के बाद छह लोगों की जान बचाई। उनके माता-पिता के साहसी निर्णय ने हृदय, यकृत, गुर्दे और आंखों की आवश्यकता वाले प्राप्तकर्ताओं को नई उम्मीद दी, जिससे अंगदान के बारे में जागरूकता बढ़ी।

Web Title : 22-Year-Old's Organ Donation Saves Six Lives After Tragic Accident

Web Summary : A 22-year-old engineering student's organ donation in Andhra Pradesh saved six lives after a fatal accident. His parents' courageous decision provided new hope to recipients needing heart, liver, kidneys, and eyes, inspiring organ donation awareness.