२००४ चा फॉर्म्युला अन् २०२४ ची लढाई?; विरोधकांच्या महाबैठकीत काँग्रेसचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:10 AM2023-07-18T08:10:09+5:302023-07-18T08:11:12+5:30

सोनिया गांधींच्या नेतृत्वात होणाऱ्या या महाबैठकीत अनेक शंकाचे निराकरण केले जाईल.

2004 Formula and 2024 Battle?; Congress's plan in the opposition's general meeting | २००४ चा फॉर्म्युला अन् २०२४ ची लढाई?; विरोधकांच्या महाबैठकीत काँग्रेसचा प्लॅन

२००४ चा फॉर्म्युला अन् २०२४ ची लढाई?; विरोधकांच्या महाबैठकीत काँग्रेसचा प्लॅन

googlenewsNext

बंगळुरू – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाप्रणित एनडीए असो अथवा काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA. भाजपाविरोधात विरोधी पक्षाने अशावेळी बैठक ठेवली आहे जेव्हा संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. संसदेच्या या अधिवेशनात विरोधी पक्षाची एकता पाहायला मिळेल. विरोधी पक्षाच्या महाबैठकीत पहिल्यांदाच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी स्वत: उपस्थित राहात आहेत. विरोधी पक्षाच्या एकजुटीला सोनिया गांधी दिशा देतील.

सोनिया गांधींच्या नेतृत्वात होणाऱ्या या महाबैठकीत अनेक शंकाचे निराकरण केले जाईल. दुसरीकडे शरद पवार-ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते ज्यांना राहुल गांधींचे नेतृत्व मान्य नाही, ते सोनिया गांधींसोबत सहजपणे काम करू शकतात. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांसोबत सोनिया गांधींचे सलोख्याचे संबंध आहेत. २०२४ ची लढाई किती तगडी होईल जे बंगळुरूत जमा झालेल्या विरोधी पक्षाच्या एकजुटीवरून दिसते. लोकसभा निवडणुकीला अद्याप ८-९ महिने बाकी आहेत. एकीकडे विरोधी पक्ष एकत्र येत आहे तर भाजपाही एनडीएचा विस्तार करत आहे.

२००४ च्या फॉर्म्युल्याने २०२४ ची लढाई

यंदा काँग्रेसकडे २००४ चा एक प्लॅन आहे. रायपूर अधिवेशनात काँग्रेसनं प्लॅन बनवला होता. २०२४ ला २००४ चा फॉर्म्युला. २००४ मध्ये भाजपाप्रणित एनडीएचा सामना करण्यासाठी काँग्रेसनं निवडणुकीआधी ५ राज्यांमध्ये समान विचारधारेच्या ६ पक्षांशी आघाडी करून मैदानात उतरली होती. काँग्रेसने महाराष्ट्रात-एनसीपी, आंध्र प्रदेश- टीआरएस, तामिळनाडू- डिएमके, झारखंड-जेएमएम, बिहार-आरजेडी-एलजेपी या प्रादेशिक पक्षांसोबत निवडणूक लढवली होती. काँग्रेसला या ५ राज्यात मोठा फायदा झाला. या ५ राज्यातील १८८ लोकसभा जागांपैकी ११४ जागा विजयी होण्यास यश आले. तर मित्रपक्षांनी ५६ जागांवर विजय मिळवला.

काँग्रेस कर्नाटकात जिंकली, हिमाचल प्रदेशातही विजय मिळवला. येणाऱ्या काळात मध्य प्रदेश, राजस्थान इथेही निवडणूक आहे. काँग्रेसची तिथेही जोरदार तयारी सुरू आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येत तडजोड करण्यास तयार आहे. त्यासाठी सोनिया गांधीही बंगळुरूत होणाऱ्या बैठकीत सहभागी होत आहे. या बैठकीत महत्त्वाचा प्रश्न असा की, विरोधी पक्षांची एकजूट २०२४ ला मोदींना हरवू शकेल का? विरोधकांची एकजूट निवडणुकीत टिकेल का? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज बंगळुरूत विरोधकांच्या बैठकीत यावर चर्चा होईल.

Web Title: 2004 Formula and 2024 Battle?; Congress's plan in the opposition's general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.