शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आंध्र प्रदेशमध्ये चकमकीत २० चंदनतस्कर ठार

By admin | Updated: April 8, 2015 02:55 IST

चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले.

चित्तूर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील शेषाचलम पर्वतीय जंगल भागात मंगळवारी पहाटे विशेष संयुक्त कृती दलाशी झालेल्या धुमश्चक्रीत २० रक्तचंदन तस्कर मारले गेले. सुमारे २०० तस्करांनी निबिड जंगलात विळे, कुऱ्हाडी, तलवारी, गावठी शस्त्रे आणि दगडफेकीसह केलेल्या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबाराचा प्रभाव लक्षात घेऊन ठार झालेल्या सहकाऱ्यांना तेथेच टाकून बाकीच्या तस्करांनी पळ काढला. ठार झालेल्या तस्करांमध्ये १२ तामिळींचा समावेश असल्यामुळे तामिळनाडूत शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. द्रमुक, भाकपा, पीएमके आणि भाजपाने आंध्र प्रदेश सरकारवर सडकून टीका केली. मारले गेलेले गरीब लाकूडतोडे असून, सरकारने तस्करी रोखताना कायदेशीर मार्ग अवलंबावा, अशी मागणीही या पक्षांनी केली. या घटनेवरून आंध्र आणि तामिळनाडूत अक्षरश: जुंपली आहे. तशातच स्वत:हून गोळीबाराच्या घटनेची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आंध्र प्रदेश सरकारला नोटीस पाठवत दोन आठवड्यांत अहवाल मागितला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या आदेशावरून जंगलभागात हवाई पाहणी केली जात आहे. पहाटे ५ ते ६ वाजतादरम्यान चित्तूरच्या ‘चंद्रगिरी मंडल’मधील शेषाचलम् जंगल भागात दोन ठिकाणी चकमकी झाल्या. काही तस्कर रक्तचंदनाची खोडे वाहून नेताना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकल्यानंतर ही धुमश्चक्री झाली. रक्तचंदनतस्करांनी वन कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ले केल्याचा दीर्घ इतिहास आहे. डिसेंबर २०१३मध्ये शेषाचलम्च्या जंगलात चंदनतस्करांनी २ वन अधिकाऱ्यांना मारले होते. विशेष कृती दलाची स्थापनाचंदनाची तस्करी रोखण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने जून २०१३मध्ये विशेष कृती दलाची (एसटीएफ) स्थापना केली असून, त्यात पोलीस अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. वीरप्पन टोळीचा सहभाग?कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन मारला गेला असला तरी त्याच्या टोळीचा शेषाचलम् जंगलातील तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आंध्र प्रदेश पोलिसांनी नाकारलेली नाही. गेल्या वर्षी आंध्र प्रदेशात तेलगू देसम्चे सरकार सत्तेवर आल्यानंतर लगतच्या तामिळनाडूतील तस्करांना मोठ्या प्रमाणात अटक करून शेकडो टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. बहुतांश तस्कर तामिळनाडूतून येत असून, ते एकावेळी शंभरावर लाकूडतोड्यांना जंगलात पाठवितात. आशियात पारंपरिक औषध आणि अन्य वापरासाठी रक्तचंदनाचा वापर केला जातो. तामिळनाडूत निदर्शनेतमिळगा वालवुरीमाई काची या संघटनेने तामिळनाडूच्या विविध भागांत निदर्शने करीत गोळीबाराचा निषेध केला आहे.