जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 15:38 IST2018-06-15T15:38:45+5:302018-06-15T15:38:45+5:30

श्रीनगरमधील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस अधिका-यांसह एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

2 police personnel & 1 civilian injured in a terrorist attack at police Naka party in Srinagar. | जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी

जम्मू-काश्मीर : श्रीनगरमधील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस अधिका-यांसह एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
ज्येष्ठ पत्रकार आणि जम्मू काश्मीरमधील रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी काल गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर आज पुन्हा दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील पोलीस चौकीकर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन पोलीस अधिका-यांसह एक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. 



 




दहशतवाद्यांकडून 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारींची हत्या
ज्येष्ठ पत्रकार आणि जम्मू काश्मीरमधील रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. श्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये बुखारी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एक एसपीओ जखमी झाला आहे. रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांच्या हत्येवर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, कॉंग्रसेचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Web Title: 2 police personnel & 1 civilian injured in a terrorist attack at police Naka party in Srinagar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.