'2.0' चित्रपटाला पायरसीचा धोका; 12000 वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 01:52 PM2018-11-29T13:52:28+5:302018-11-29T19:51:11+5:30

मद्रास हायकोर्टाने 37 इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर्सना (ISPs) 12000 वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे.

2-0 Movie Controversy Court Order To Block 12000 Websites To Save The Movie From Piracy | '2.0' चित्रपटाला पायरसीचा धोका; 12000 वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश 

'2.0' चित्रपटाला पायरसीचा धोका; 12000 वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश 

Next
ठळक मुद्दे'2.0' चित्रपटाला पायरसीचा धोका12000 वेबसाइट ब्लॉक करण्याचा आदेशचित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 50 कोटींची कमाई

नवी दिल्ली : अभिनेते रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, मद्रास हायकोर्टाने 37 इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर्सना (ISPs) 12000 वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. या ब्लॉक करण्याचा आदेश दिलेल्या वेबसाइटवर तमिळ चित्रपटांचे पायरेटेड व्हर्जन दाखविले जाते. 

ब्लॉक करण्याचा आदेश दिलेल्या लिस्टमध्ये 2000 हून अधिक वेबसाइट्सना 'तमिळ रॉकर्स' ऑपरेट करत आहे. लाइका प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने यासंबंधी याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणी दरम्यान न्यायाधीश एम. सुंदर यांनी बुधवारी 37 इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर्सना 12000 वेबसाइट ब्लॉक करण्याचा आदेश आहे.  2, 564 वेबसाइट्स अवैध असल्याची लिस्ट लाइका प्रोडक्शनचे वकिलांनी हायकोर्टात सादर केली होती. 


चित्रपट समीक्षक रमेश बाला यांना सांगितले की, पहिला शो सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाची 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख तिकिटे विकली गेली आहेत. 600 कोटींमध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, ट्रेड एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 50 कोटींची कमाई केली आहे.  
 

Web Title: 2-0 Movie Controversy Court Order To Block 12000 Websites To Save The Movie From Piracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.