1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट: आरोपी अहमद लंबूला गुजरातमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 10:23 AM2018-06-01T10:23:22+5:302018-06-01T10:23:22+5:30

अहमद लंबूला वडसाळमधून अटक केली आहे.

1993 Mumbai blasts case : wanted terrorist accused in mumbai serial blast ahmad lamboo arrested by gujrat ats | 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट: आरोपी अहमद लंबूला गुजरातमधून अटक

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट: आरोपी अहमद लंबूला गुजरातमधून अटक

Next

वडसाळ- गुजरात एटीएसने 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सहभागी असणारा दहशतवादी अहमद लंबूला वडसाळमधून अटक केली आहे. अहमद लंबू हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा जवळचा मानला जातो. एटीएसने गुरूवारी रात्री एका विशेष मोहिमेअंतर्गत छापेमारी करून लंबूला अटक केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने अहमद लंबूला पकडण्यासाठी लूक आऊट नोटिस जारी केली होती व इंटरपोललाही सूचना दिली होती. अहमद लंबूबद्दल माहिती देणाऱ्याला पाच लाख रूपयांचं बक्षिसही ठेवण्यात आलं होतं.

दरम्यान, गेल्या वर्षी विशेष टाडा कोर्टाने 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाचा निर्णय देत दाऊदचे जवळचे अबू सालेमसह सहा दहशतवाद्यांना शिक्षा सुनावली होती.  अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर अब्दुल कयूम नावाच्या एका आरोपीला निर्दोष सोडण्यात आलं. 1993 मुंबई साखळी स्फोटाप्रकरणी विशेष टाडा कोर्टाकडून निर्णय आल्यानंतर काही दिवसांनी दोषी मुस्तफा दोसाचा ह्रदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला. 

मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर मुस्तफा दोसानेचं अहमद लंबूला पळून जाण्यास मदत केली होती, असं बोललं जातं. 12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये दोन तासाच्या आत 12 भीषण बॉम्बस्फोट झाले. या भीषण बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला तर 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. 

Web Title: 1993 Mumbai blasts case : wanted terrorist accused in mumbai serial blast ahmad lamboo arrested by gujrat ats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.