शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

1984 Anti Sikh Riots : मंडोली कारागृहातील बॅरेक क्रमांक 14मध्ये राहणार सज्जन कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 4:44 PM

1984 Anti Sikh Riots : 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले काँग्रेसचा माजी नेता सज्जन कुमारनं सोमवारी (31 डिसेंबर) कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर मंडोली कारागृहात कुमारची रवानगी करण्यात आली.

ठळक मुद्देमंडोली कारागृहात सज्जन कुमारची रवानगीबॅरेक क्रमांक 14मध्ये राहणार सज्जन कुमार1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली - 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले काँग्रेसचा माजी नेता सज्जन कुमारनं सोमवारी (31 डिसेंबर) कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर मंडोली कारागृहात कुमारची रवानगी करण्यात आली. येथे बॅरेक क्रमांक 14 मध्ये त्याला ठेवण्यात येणार आहे. 17 डिसेंबर रोजी  दिल्ली हायकोर्टानं सज्जन कुमारला शीखविरोधी दंगलीप्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिवाय, 31 डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेशही दिले होते.  यानंतर, दरम्यान, सज्जन कुमारनं आत्मसमर्पण करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली हायकोर्टात केला होता.  काही कौटुंबिक जबाबदाऱ्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे आत्मसमर्पणाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती.  पण कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आणि 31 डिसेंबर रोजीच आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.  (1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारचे आत्मसमर्पण, मंडोली कारागृहात रवानगी)

(1984 शीख विरोधी दंगल प्रकरण: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा)17 डिसेंबरला दिल्ली हायकोर्टानं शीखविरोधी दंगलीप्रकरणात ऐतिहासिक निर्णय देत सज्जन कुमारला दोष ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आपला निकाल देताना कोर्टानं म्हटले होते की, '1984 शीखविरोधी दंगलीमध्ये दिल्लीतील 2700 शीख नागरिकांची हत्या करण्यात आले होती आणि हे हत्याकांड म्हणजे अविश्वसनीय नरसंहार होता. 

 34 वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमारला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याआधी याच प्रकरणात त्यांची मुक्तता झाली होती. 1 नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती.या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सज्जन कुमारची सुटका केली. या निकालाला सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं. दिल्लीच्या कँटॉनमेंटच्या अगदी समोर ही घटना घडली, त्यावेळी प्रशासन नेमकं काय करत होतं, असा प्रश्न सुनावणीवेळी न्यायालयानं विचारला होता.

 

टॅग्स :1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगलcongressकाँग्रेसsikhशीख