शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

कडक सुरक्षाव्यवस्थेत आज उघडणार श्रीनगरमधील 190 शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 8:25 AM

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेल्या श्रीनगरमधील शाळा आज उघडणार आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेल्या श्रीनगरमधील शाळा आज उघडणार आहेत. सुमारे 14 दिवसांच्या खंडानंतर श्रीनगरमधील 190 शाळांची घंटी खणाणणार आहे आहे. तसेच परिस्थिती आणखी निवळल्यावर इतर जिल्ह्यांमधील शाळाही सुरू केल्या जातील. दरम्यान, कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लष्करासह अन्य सुरक्षा दले 24 ताच मोर्चावर तैनात आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी रविवारी सांगितले की, ''सध्या केवळ श्रीनगरमधील प्राथमिक शाळा सुरू करण्यात येत आहेत. ज्या क्षेत्रांमधील शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये लासजान, सांगरी, पंथचौक, नौगाम, राजबाग, जवाहरनगर, गगरीबाल, धारा, थीड, बाटमालू आणि शाल्टेंग यांचा समावेश आहे. तसेच परिस्थिती सुधारल्यावर अन्य विभागातील शाळा उघडल्या जातील.''  दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील दैनंदिन व्यवहारांवरील शिथील करण्यात आलेल्या  निर्बंधांवरील सूट कायम राहणार आहे.  रोहित कंसल यांनी पुढे सांगितले की, ''श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी शनिवारी शिक्षण विभागातील अधिकारी आणि शाळांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जिल्ह्यातील शाळांना सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षा ही जिल्हा प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी सर्वा आवश्यक उपाय करण्यात आले आहेत.  दरम्यान,  जम्मूमध्ये पसरवण्यात येत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जम्मूमधील पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा रविवारी पुन्हा बंद करण्यात आली होती. एका दिवसापूर्वीच जम्मूमधील इंटरनेट सेवा कमी गतीने सुरू करण्यात आली होती. मात्र आता अफवांना रोखून शांतता कायम राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर हळूहळू निर्बंध हटवण्यात आले होते. तसेच या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा संथगतीने सुरू करण्यात आली होती. 

टॅग्स :SchoolशाळाJammu Kashmirजम्मू-काश्मीर