१८... काटोल... चोरी

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:38+5:302014-12-18T22:39:38+5:30

(फोटो)

18 ... katol ... theft | १८... काटोल... चोरी

१८... काटोल... चोरी

(फ
ोटो)
दुचाकी चोरट्यांची टोळी अटकेत
सहा लाखांची मुद्देमाल जप्त : तीन चोरट्यांसह १८ जणांना अटक
काटोल : मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीतील चोरट्यांना अटक करण्यात काटोल पोलिसांना यश आले. या कारवाईत पोलिसांनी तीन चोरटे आणि चोरीच्या मोटरसायकली विकत घेणाऱ्या एकूण १८ जणांना अटक करून २० मोटरसायकलींसह एकूण सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पिंटू ऊर्फ प्रमोद केशव राऊत (२७), राहुल अशोक हजारे (२१) दोघेही रा. पेठ बुधवार, काटोल, अली ऊर्फ सचिन कैलास भारसकरे (१९, रा. सायखेड, कोंढाळी, ता. काटोल) अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे असून, प्रमोद हा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रमोद व राहुल हे दोघेही वर्षभरापासून मोटरसायकली चोरून त्या विकण्याचे काम करायचे.
त्यांनी काटोल शहरातून नऊ , जलाखेड्यातून तीन, नरखेड येथून एक, सावनेरातून चार, खाप्यातून एक, कळमेश्वरातून एक आणि नागपूर शहरातून एक अशा एकूण १९ मोटरसायकली चोरून नेल्या व त्यांची कारंजा, सिंगारखेडा, तीनखेडा, लिंगा, नांदगावपेठ, धाडीसाहूर आदी ठिकाणी परस्पर विक्री केल्याचे काटोल पोलिसांना प्राथमिक तपासात आढळून आले. दादाराव जानराव हागुणे (२३, रा. काटोल), शरद हिरुळकर (३५, रा. काटोल), मनोज नत्थू रेवतकर (२३, रा. सिंगारखेडा), संदीप अंबादास क्षीरसागर (२७, रा. काटोल), कैलास हरिश्चंद्र पाटील (२३, रा. लिंगा), जगदीश अंबादास क्षीरसागर (२७, रा. काटोल), प्रशांत ज्ञानेश्वर शिरपूरकर (२०, रा. काटोल), अहमद नियासीन मौलाना (३२,काटोल), योगेश अरुण चौधरी (२२, रा. काटोल), योगेश सुरेश पोहणे (२०, रा. काटोल), खुशाल सुरेश बोकडे (२२, रा. कारंजा), शरद नामदेव कोहळे (२५, रा. येरला धोटे) अशी मोटरसायकली विकत घेणाऱ्यांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्यावरही भादंवि ४११ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: 18 ... katol ... theft