१७... तारसा... पाऊस

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:30+5:302014-12-18T00:40:30+5:30

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात

17 ... taura ... rain | १७... तारसा... पाऊस

१७... तारसा... पाऊस

काळी पावसामुळे शेतकरी संकटात
तारसा : परिसरातील तारसा, बाबदेव, चाचेर, इसापूर, आष्टी, नवेगाव, निमखेडा, नंंदापुरी, बानोर, गांगनेर शिवारात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने धानाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे धान उत्पादक पुन्हा संकटात सापडले आहेत.
यावर्षी पावसाने दिरंगाई केल्याने धानाचे रोवणे उशिरा करण्यात आले. त्यातच धानाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच चिंतेत असताना रविवारी व सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे कापणीला आलेला व कापणी केलेला धान भिजला. वाढती थंडी व दमट वातावरणामुळे धानाच्या लोंब्यांना आता अंकुर फुटण्याची तसेच धानाची प्रत खालावण्याची शक्यता बळावली आहे. आधीच धानाचा उत्पादनखर्च वाढल्याने तसेच कापणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यातच पावसाने भर टाकली. (वार्ताहर)
***

Web Title: 17 ... taura ... rain