शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१७... रामटेक... तणाव

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नागार्जुन, त्रिशूळ प्रकरणामुळे तणाव

नागार्जुन, त्रिशूळ प्रकरणामुळे तणाव
प्रशासनाची कुशल भूमिका : भाविकांनी घेतले दर्शन
रामटेक/काचूरवाही : स्थानिक नागार्जुन टेकडीसंबंधीचा हिंदू व बौद्ध बांधवांमधील वाद मागील काही वर्षांपासून सुरू आहे. शिवरात्रीला मंदिरात त्रिशूळ नेताना विरोध केला जातो. सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मंगळवारी मंदिरात त्रिशूळ नेण्याचा व त्याला विरोध करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने परिस्थिती कुशलतेने हाताळल्याने तणाव निवळला. त्रिशूळ मंदिरात गेला नसला तरी भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आली नव्हती.
अंदाजे १५ वर्षांपासून हा वाद सुरू आहे. अज्ञात समाजकंटकाने शिवमंदिरातील नंदी चोरून नेल्याने हा वाद निर्माण झाला तो अद्यापही सुरूच आहे. दर महाशिवरात्रीला हा वाद उफाळून येतो. माजी आ. आशिष जयस्वाल हे महाशिवरात्रीला मंदिरात वाजतगाजत त्रिशूळ न्यायचे. त्याला विरोध केला जायचा. त्यामुळे हा वाद संवेदनशील बनला. गेल्या तीन वर्षांपासून टेकडीच्या पायथ्याशी प्रशासनाकडून त्रिशूळ अडविला जातो. कारण गडावर त्रिशूळ नेऊ दिल्या जात नाही. तसे न्यायालयाचे आदेश आहेत. दुसरीकडे या त्रिशूळ रोहणाला विरोध करणारी मंडळी मोठ्या संख्येने जमतात. त्यामुळे प्रशासनाला धडकी भरते.
यावर्षी बाबासाहेबांचे शेकडो अनुयायी विवादाग्रस्तस्थळी जमले होते. त्यात महिलांचाही समावेश होता. बजरंग दलाच्या नेतृत्वात टेकडीवरील शिवमंदिरात त्रिशूळ नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संख्येने कमी पण जोशपूर्ण तरुणांनी त्रिशूळ कैलास पुरी महाराजांच्या मठापर्यंत पोहोचविला. त्या ठिकाणीत्तो प्रशासनातर्फे अडविण्यात आला. त्रिशूळ पुढे नेण्यास मज्जाव केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांच्या रेटारेटीत राहुल टोंगसे या तरुणाचा शर्ट फाटल्याने त्याला पोलिसांच्या वाहनात बसविण्यात आले.
उपविभागीय अधिकारी शेखर सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंखे, तहसीलदार प्रसाद मते, पोलीस निरीक्षक आगरकर, उपनिरीक्षक भालेकर आदींनी तरुणांना थांबवून परिस्थिती हाताळली. भाविकांना दर्शनासाठी वाट मोकळी करून देण्यात आली होती. दुसऱ्या बाजूच्या नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने तणाव निवळला. माजी आ. जयस्वाल मात्र यावर्षी नागार्जुन टेकडीकडे फिरकले नाही. शिवरात्रीलाच जाणे काही गरजेचे नाही. आपण केव्हाही त्रिशूळ घेऊन शिवमंदिरात जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
***