१७... खापरखेडा... खून... जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:56+5:302015-02-18T00:12:56+5:30
---------चौकट-------

१७... खापरखेडा... खून... जोड
---- -----चौकट-------घटनेची पार्श्वभूमीसिल्लेवाडा येथील डगरू सूर्यवंशी (६२) हे सिद्धूचे सासरे होत. सिद्धू हा त्याच्या साळ्याच्या लग्नासाठी आला होता. गुरुवारी रात्री सिल्लेवाडा येथे स्वागत समारंभ पार पडला. त्यात गोलू ऊर्फ पंकज तेजराम कुमरिया व दुर्गेश श्रीलोकचंद कुरील यांचे अर्जुन सिगोतिया व त्याच्या मित्रांसोबत डान्स करण्यावरून वाद निर्माण झाला. ही मंडळी कार्यक्रम स्थळाबाहेर जाताच त्यांच्यात हाणामारी झाली. त्यात दुर्गेशने अर्जुनला चाकूने जखमी केले. सिद्धू हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. तेव्हापासून सिद्धू हा मानसिक तणावात होता. मारहाण करणारे आपल्याला जीवे मारतील, अशी भीती त्याच्या मनात होती. सिद्धू व त्याची पत्नी दोन दिवसांपूर्वी गावी जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर गेले होते. मात्र, त्याने पत्नीला गावी पाठवून तो सासरी परत आला़ सिद्धूच्या मनातून ही भीती गेली नसल्याने सूर्यपालच्या मोठ्या मुलाने त्याला फोन करून साक्षगंधाचे निमंत्रण दिले होते. ***