काँग्रेसचे १६ हजार कार्यकर्ते  गावागावांत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 05:35 IST2021-08-20T05:35:29+5:302021-08-20T05:35:49+5:30

Congress : राज्यातील ब्राह्मण मतदारांचे मोठे समर्थन काँग्रेसला मिळत आहे. आदित्यनाथ यांच्या ब्राह्मणविरोधी धोरणाचा हा परिणाम आहे.

16,000 Congress workers will go to villages | काँग्रेसचे १६ हजार कार्यकर्ते  गावागावांत जाणार

काँग्रेसचे १६ हजार कार्यकर्ते  गावागावांत जाणार

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातकाँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष पूर्ण ताकद लावत आहे. एकीकडे नव्या नियुक्त्या केल्या जात असताना गावागावांत जाऊन लोकांशी संवाद साधला जात आहे. त्यासाठी १६ हजार कार्यकर्ते, नेते यांच्या जयभारत महा संपर्क अभियानाला सुरुवात होत आहे. 

कार्यकर्ते गावात ७५ तास थांबून संवाद साधतील. तसेच मोदी- योगी यांचा खोटेपणा उघड करतील. काँग्रेसचे लक्ष्य तरुण, बेरोजगार, शेतकरी असेल. सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या निकटवर्ती आमदार मोना मिश्रा यांनी सांगितले, यावेळी निकाल वेगळे असतील.

राज्यातील ब्राह्मण मतदारांचे मोठे समर्थन काँग्रेसला मिळत आहे. आदित्यनाथ यांच्या ब्राह्मणविरोधी धोरणाचा हा परिणाम आहे. भाजप आणि बसपा भलेही ब्राह्मणांना ओढण्याचा प्रयत्न करोत; पण यावेळी ब्राह्मणांचा पाठिंबा काँग्रेसला मिळत आहे. 

Web Title: 16,000 Congress workers will go to villages