१६ वर्षांची मुलगी बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रासोबत एकाच वेळी बोलायची, दोघांनीही मिळून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:08 IST2026-01-27T14:05:33+5:302026-01-27T14:08:34+5:30

Crime News: उत्तर प्रदेशमधील लखनौमधील पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहेय येथे एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या करण्यात आली.

16-year-old girl was talking to her boyfriend and his friend at the same time, both of them committed murder together | १६ वर्षांची मुलगी बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रासोबत एकाच वेळी बोलायची, दोघांनीही मिळून केली हत्या

१६ वर्षांची मुलगी बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रासोबत एकाच वेळी बोलायची, दोघांनीही मिळून केली हत्या

उत्तर प्रदेशमधील लखनौमधील पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहेय येथे एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या करण्यात आली. १३ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या या मुलीला अंशू गौतम उर्फ लक्की याने तिला भेटण्यासाठी बोलावले होते. या मुलीने ती फिरण्यासाठी नैनिताल येथे जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. मात्र वास्तव काही वेगळंच आहे. मित्रांसोबत मिळून अंशू याने या मुलीची हत्या केल्याचा आरोप होत आहे.

पोलीस तपासामधून समोर आलेल्या माहितीनुसार अंशू गौतम हा या मुलीवर प्रेम करायचा. मात्र ती मुलगी त्याचा मित्र आशिक यादव याच्यासोबतसुद्धा चोरून बोलते, असा संशय अंशूला आला. त्यामुळे या दोघांनीही हा आपला अपमान असल्याचे समजून या मुलीचा काटा काढण्याचा डाव आखला. त्यांनी १३ जानेवारी रोजी फोन करून या मुलीला बोलावून घेतले. त्यानंतर तिला कारमध्ये बसवले. तसेच धावत्या गाडीत मारहाण करून तिचा गळा आवळून खून केला.

त्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह सरोजनीनगर येथील रेल्वे रुळांवर ठेवून ही आत्महत्या असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, रुळावरून आलेल्या भरधाव ट्रेनखाली सापडून या तरुणीचं डोकं धडापासून वेगळं झालं. त्यानंतर आरोपींनी ओळख लपवण्यासाठी या तरुणीचा मोबाईल तोडून फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करत आरोपी अंशू गौतम याच्यासह आशिक यादव, रिशू यादव आणि वैभव सिंह राजपूत यांना  अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

दरम्यान, आम्ही १४ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलीस मुलगी सापडेल असे सांगत राहिले, असा आरोप मृत मुलीच्या आईने केला आहे.  तसेच आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना फाशी देण्याची मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.   

Web Title : उत्तर प्रदेश: ईर्ष्यालु प्रेमी और दोस्त ने किशोर लड़की की हत्या की

Web Summary : लखनऊ में, ईर्ष्या से प्रेरित होकर एक 16 वर्षीय लड़की की उसके प्रेमी और उसके दोस्त ने हत्या कर दी। दोनों ने कार में उसका गला घोंट दिया, फिर आत्महत्या का नाटक करने के लिए उसके शरीर को रेलवे ट्रैक पर रख दिया। पुलिस ने प्रेमी और उसके साथियों को गिरफ्तार कर लिया।

Web Title : Jealous Boyfriend, Friend Kill Teen Girl in Uttar Pradesh

Web Summary : In Lucknow, a 16-year-old girl was murdered by her boyfriend and his friend, fueled by jealousy. The duo strangled her in a car, then placed her body on railway tracks to fake suicide. Police arrested the boyfriend and his accomplices.