शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

जम्मू काश्मीर : सीआरपीएफ तळावरील आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद, हल्ल्यामागे पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 9:08 AM

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर रविवारी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे जम्मू-काश्मीरमधील पोलिसाच्या मुलाचा हात असल्याचे बोलले जात आहे.

श्रीनगर -  दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले, तर आणखी 3 जण जखमी झाले. नंतर सुरक्षा दलांनी कित्येक तास केलेल्या जबाबी कारवाईत हल्ला करणारे दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.दरम्यान, या हल्ल्यामागे स्थानिक तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.  या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी एक जण अवघ्या 16 वर्षांचा होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, त्राल येथे राहणारा 16 वर्षीय दहशतवादी फरदीन अहमद खांदे हा दहावीचा विद्यार्थी होता. विशेष म्हणजे फरदीनचे वडील जम्मू-काश्मीर पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

 

5 जवानांना वीरमरण

गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणा-या सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.

सूत्रांनुसार, तळावरील निवासी इमारतीमध्ये गाढ झोपेत असलेले जवान या गडबडीने जागे झाले व अनेक जण बाहेर आले. अंदाधुंद गोळीबार करत, आत शिरलेल्या अतिरेक्यांच्या गोळ््यांनी यापैकी एक जवान जागीच ठार झाला. जखमींपैकी आणखी ३ जवानांना इस्पितळात उपचार सुरू असताना वीरमरण आले, तर एक जवान इसिपतळात नेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दगावला.

तळाच्या आवारात घुसलेले अतिरेकी नंतर गोळीबार करत प्रशासकीय इमारतीच्या आश्रयास गेले. तोपर्यंत सीआरपीएफच्या स्वत:च्या जवानांखेरीज जम्मू-काश्मीर पोलीस आणि विशेष पथकाची कुमक आली. अतिरेकी लपलेल्या इमारतीस वेढा घातला गेला. सायंकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी अधून-मधून गोळीबार सुरू होता. दोन अतिरेक्यांना खिंडीत गाठून ठार करण्यात यश आले. घुसलेला तिसरा अतिरेकी न सापडल्याने, संध्याकाळपर्यंत तळाच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू होती.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर