नवी दिल्ली : कर्नाटकच्या मंगळुरू येथील किनाऱ्यालगत लागलेल्या आगीतून तटरक्षक दलाचे ३० सदस्य आणि १६ वैज्ञानिक यांना वाचविण्यात आले. जहाज विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत ‘रिसर्च शिप’च्या आतील बाजूस आग लागल्याचे कळताच तटरक्षक दलाने विक्रम आणि सुजय या जहाजांना तिथे पाठवले. तब्बल आठ तासांनंतर ही आग विझवण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला, असे तटरक्षकचे महानिरीक्षक (पश्चिम क्षेत्र) विजय छापेकर यांनी सांगितले.
आग लागलेल्या जहाजातून ४६ जणांची केली सुटका १६ वैज्ञानिक बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 06:58 IST