शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 9:03 AM

जवळपास 26 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत.

नवी दिल्ली - राज्यसभेमध्ये 2020 वर्षात नव्याने आलेल्या 62 खासदारांपैकी 16 खासदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जवळपास 26 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत. खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांतून याबाबत माहिती मिळत आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने केलेल्या विश्लेषणानंतर ही माहिती समोर आली आहे. 16 आमदारांपैकी 11 जणांवर हत्या, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि दरोडा यासारखे गुन्हे आहेत. एका खासदाराविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन खासदारांनी त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे.

तीन खासदारांनी महिलांवरील गुन्हेगारीसंबंधित खटल्यांबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे. तर एका खासदाराने बलात्काराच्या घटनेची माहिती दिली आहे. भाजपाच्या 18 खासदारांपैकी 2, काँग्रेसचे 9 पैकी 3 खासदार, राष्ट्रवादीचे दोन्ही खासदार, वायएसआयआरचे 4 पैकी 2 आणि बीजेडीके 25 टक्के, तृणमूल काँग्रेसचे 25 टक्के, जेडीयूचे 50 टक्के, द्रमुकचे 33 टक्के, आरजेडीचे 50 टक्के खासदार आहेत. मध्य प्रदेशातील 3 पैकी 1 खासदार, राजस्थानातील एक आणि झारखंडमधील 2 खासदारांनी त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची माहिती दिली आहे. 

नव्याने निवडून आलेल्या खासदारांपैकी 84 टक्के म्हणजेच 52 खासदार हे करोडपती आहेत. ज्यामध्ये वायएसआर काँग्रेसचे अल्लाअयोध्यारामी रेड्डी सर्वात धनाढ्य खासदार आहेत. त्यांच्याकडे तब्बल 25,7775,79,180 रुपये एवढी संपत्ती आहे. त्यानंतर याच पक्षाचे नाथवानी परिमल हे दुसरे सर्वात श्रीमंत खासदार असून त्यांच्याकडे देखील तब्बल 3,9683,96,198 रुपये एवढी संपत्ती आहे.

काँग्रेसकडून भाजपामध्ये आलेले ज्योतिरादित्य सिंधिया हे तिसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 3,79,03,29,144 रुपयांची संपती आहे. भाजपाच्या महाराजा संजोओबा लिसेम्बा यांच्याकडे सर्वात कमी 5,48,594 रुपये एवढी मालमत्ता आहे. तसेच भाजपाचे अशोक गस्ती यांची 19,40,048 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या अर्पिता घोष तिसर्‍या क्रमांकावर आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धतीने कोरोनावर करता येते मात; नोबेल विजेत्या तज्ज्ञाचा दावा

'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर

"मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किमती अनलॉक केल्या"

"विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं"; 'तो' फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

धक्कादायक! तब्बल 62 एन्काउंटर करणाऱ्या माजी DSP ची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं...

CoronaVirus News : देशात कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने पुन्हा रेकॉर्ड मोडला

CoronaVirus News : कौतुकास्पद! मजुरांच्या मुलांना घेता यावे ऑनलाईन शिक्षण म्हणून 'त्यांनी' दान केले फोन

 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे