15 नक्षलवाद्यांचे आत्मसर्पण; 9 जणांवर एकूण 48 लाखांचे बक्षीस, 5 महिलांचाही समावेश...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 21:11 IST2025-11-24T21:11:01+5:302025-11-24T21:11:17+5:30
Naxal Surrender: 2 वर्षांत 2,150 पेक्षा अधिक नक्षलवादी मुख्य प्रवाहात

15 नक्षलवाद्यांचे आत्मसर्पण; 9 जणांवर एकूण 48 लाखांचे बक्षीस, 5 महिलांचाही समावेश...
Naxal Surrender: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. 15 कुख्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी सुरक्षा दलांसमोर शरणागती पत्करली, यापैकी 9 जणांवर एकूण 48 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 5 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नक्षलवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर नियंत्रण केंद्रात आत्मसमर्पण केले.
सरकारी योजनांचा परिणाम
अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या "नियाद नेल्लानार" (तुमचे चांगले गाव) योजनेने ते खूप प्रभावित झाले आहेत, ज्याचा उद्देश दुर्गम गावांमध्ये विकासकामांना चालना देणे आहे. नवीन आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण, "पूना मार्गम (सामाजिक पुनर्मिलनासाठी पुनर्वसन)," हे त्यांनी सशस्त्र चळवळ सोडण्याचा निर्णय घेण्याचे कारण होते.
कोणत्या नक्षलवाद्यावर किती बक्षीस?
शरणागती पत्करणाऱ्यांमध्ये PLGA बटालियन क्रमांक 1 मधील चार हार्डकोर नक्षलवादी आहेत. प्रत्येकावर 8 लाख रुपये बक्षीस जाहीर होते. यात माडवी सन्ना (28), सोडी हिडमे (25), सूर्यम उर्फ रव्वा सोमा (3), मीना उर्फ माडवी भीमे (28) यांचा समावेश आहे. याशिवाय, तसेच 2 एरिया कमिटी सदस्य प्रत्येकी ₹5 लाख बक्षीस, 1 माओवादी ₹3 लाख बक्षीस, दोन इतर नक्षलवादी ₹2 लाख आणि ₹1 लाख बक्षीस सामील आहेत.
आत्मसमर्पण करणाऱ्यांना आर्थिक मदत
पोलिसांनी सांगितले की, शासनाच्या धोरणांनुसार प्रत्येक नक्षलवाद्याला 50 हजार रुपयांची केली जाईल. याशिवाय, पुनर्वसनासाठी आवश्यक सर्व लाभ उपलब्ध करून दिले जातील.
2 वर्षांत 2,150 पेक्षा अधिक नक्षलवादी मुख्य प्रवाहात
पोलिसांच्या नोंदीनुसार, मागील 23 महिन्यांत 2,150 हून अधिक नक्षलवाद्यांनी, ज्यात टॉप कॅडरदेखील आहेत, हिंसा सोडून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. सुकमामधील ही नवीन शरणागतीची घटना, राज्यातील नक्षलवादाविरुद्धच्या मोहिमेला मोठा वेग देणारी ठरली आहे.