शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१५... गुन्हे

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नरखेड शिवारातून बकऱ्या पळविल्या

नरखेड शिवारातून बकऱ्या पळविल्या
नरखेड : शेतातील गोठ्यात बांधलेल्या चार बकऱ्या आणि चार बोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नरखेड शिवारात शुक्रवारी मध्यरात्री घडली. फिर्यादी भूषण दिनेश खत्री (३२, रा. नरखेड ) यांची नरखेड - मोहदी (दळवी) मार्गावर शेती असून, शेतात गोठा आहे. त्यांनी त्यांच्या मालकीच्या बकऱ्या नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधल्या होत्या. दरम्यान, चोरट्यांनी त्या गोठ्यात प्रवेश करून चार बकऱ्या व चार बोकड चोरून नेले. या जनावरांची किंमत ३५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास हवालदार भटकर करीत आहे.
***
संपत्तीच्या वादातून आईस मारहाण
नरखेड : संपत्तीच्या वादातून मुलासह अन्य महिलेने आईस मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना नरखेड शहरात शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली.
पंचफुला संपत गायधने (५२, रा. नरखेड) असे जखमी फिर्यादीचे नाव असून, किशोर संपत गायधने (३४, रा. नागपूर) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पंचफुला व किशोर यांच्यात मागील काही दिवसांपासून संंपत्तीच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी यांच्यात वाद उद्भवला. या वादातून किशोर व त्याच्यासोबत असलेल्या एका महिलेने पंचफुला व तिच्या मुलाला मारहाण केली. यात पंचफुलाचा हात फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी भादंवि ३२४, ३२५, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरेापींना अटक केली. सदर घटनेचा तपास संजय इंगोले करीत आहे.
***
कालव्यात बुडून एकाचा मृत्यू
नागपूर : कालव्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलंगखेडी शिवारात गुरुवारी रात्री घडली.
फुलचंद कवडू उइके (५०, रा. तेलंगखेडी) असे मृताचे नाव आहे. फुलचंदला दारूचे व्यसन होते. दरम्यान, तो दारूच्या नशेत तेलंखेडी शिवारातील कालव्यात कोसळला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर घटनेचा तपास सहायक फौजदार ठाकूर करीत आहे.
***