‘बिर्याणी इफ्तार पार्टी’ करून हाडे गंगेत फेकली, वाराणसीमध्ये १४ तरुण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 19:47 IST2026-03-17T19:47:32+5:302026-03-17T19:47:59+5:30

Varanasi Crime News: वाराणसीमध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या गंगा नदीमध्ये इफ्तार पार्टी केल्यानंतर हाडे नदीत फेकल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी १४ तरुणांना अटक केली आहे.

14 youths arrested in Varanasi for throwing bones into Ganges after holding 'Biryani Iftar Party' | ‘बिर्याणी इफ्तार पार्टी’ करून हाडे गंगेत फेकली, वाराणसीमध्ये १४ तरुण अटकेत

‘बिर्याणी इफ्तार पार्टी’ करून हाडे गंगेत फेकली, वाराणसीमध्ये १४ तरुण अटकेत

वाराणसीमध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या गंगा नदीमध्ये इफ्तार पार्टी केल्यानंतर हाडे नदीत फेकल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी १४ तरुणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या तरुणांचा गंगा नदीमध्ये इफ्तार पार्टी करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या इफ्तार पार्टीवेळी या तरुणांनी मांसाहाराचंही सेवन केलं होतं. तसेच पार्टीनंतर हाडं नदीमध्ये फेकली होती. या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धार्मिक भानवा दुखावल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यात भारतीय जनता युवा मोर्चाचे  शहराध्यक्ष रजत जयस्वाल यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य विचारात घेऊन आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पकडण्यात आलेल्या तरुणांपैकी बहुतांश तरुण हे मदनपुरा परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावण्यासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आली असून, त्यांची तुरुंगात रवानगी करण्याची तयारी सुरू आहे.    

Web Title : वाराणसी: गंगा में बिरयानी इफ्तार पार्टी और हड्डियां फेंकने पर 14 गिरफ्तार

Web Summary : वाराणसी में गंगा नदी के किनारे बिरयानी इफ्तार पार्टी करने और कथित तौर पर हड्डियों को नदी में फेंकने के आरोप में चौदह युवकों को गिरफ्तार किया गया है। इस हरकत से आक्रोश फैल गया, जिसके बाद धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने की शिकायतें और गिरफ्तारियां हुईं।

Web Title : Varanasi: 14 Arrested After Biryani Iftar Party, Bones Thrown in Ganga

Web Summary : Fourteen youths were arrested in Varanasi after a video surfaced showing them holding an Iftar party with biryani on the banks of the Ganga, and allegedly throwing bones into the river. The act sparked outrage, leading to complaints and arrests for hurting religious sentiments.