राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे ११३ वेळा उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 08:36 IST2022-12-30T08:35:16+5:302022-12-30T08:36:48+5:30

केंद्रीय राखीव पोलिस दलाने दिली गृहमंत्रालयाला माहिती.

113 times violation of security rules by rahul gandhi | राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे ११३ वेळा उल्लंघन

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे ११३ वेळा उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२० पासून ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानच त्यांनी अनेक वेळा सुरक्षा सूचनांचे उल्लंघन केले आहे, असे केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) गुरुवारी गृहमंत्रालयाला सांगितले.

काँग्रेसने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राहुल गांधींच्या सुरक्षेतील त्रुटींची तक्रार केली होती. दुसऱ्याच दिवशी सीआरपीएफने उत्तर दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 113 times violation of security rules by rahul gandhi