शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात ११ मातब्बरांचे निकाल ठरणार लक्षवेधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:38 IST

आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचारानंतर तेलंगणातील अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले.

- धनाजी कांबळे
हैदराबाद : आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचारानंतर तेलंगणातील अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे ११ डिसेंबरला जाहीर होणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.
टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, टी. हरीश रावत, के. टी.रामा राव, ई. राजेंद्र, जी. जगदीश रेड्डी, जोगू रामण्णा, उत्तमकुमार रेड्डी, जेना रेड्डी कोंडूरू, के. लक्ष्मण, एम.मुरलीधर राव, अकबरूद्दिन ओवेसी यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार असून, यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.
टीआरएस विरुद्ध काँग्रेस-टीडीपी-टीजेएस-सीपीआय महाआघाडी अशाच चुरशी बहुसंख्य ठिकाणी होणार असून, काही ठिकाणी भाजपाचे उमेदवारही चांगली टक्कर देतील, असे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला राज्यात पाच जागा मिळाल्या होत्या. एमआयएमची ताकद हैदराबाद शहरातच असून, त्यांनी आठच उमेदवार उभे केले आहेत. गेल्या वेळी त्यांचे सात जण निवडून आलेच होते. यंदा आठही उमेदवार निवडून येतील, असा दावा अकबरुद्दिन ओवेसी यांनी केला आहे.
अकबरुद्दिन ओवेसी यांनी टीआरएसला उघड पाठिंबाच दिला आहे. राज्यात टीआरएसचे सरकार येईल, असे ते स्वत:च सांगत आहेत. तरीही टीआरएसला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्यास ओवेसींचे आमदार मदतीला धावतील, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीआरएस ही काँग्रेसची बी टीम असल्याची टीका केली असली तरी प्रसंगी राज्यात काँग्रेसचे सरकार येऊ नये, यासाठी भाजपाही टीआरएसलाच बाहेरून पाठिंबा देऊ शकेल. त्यामुळे काँग्रेसच्या पुढाकाराने तयार झालेल्या आघाडीच्या नेत्यांनी भाजपा व टीआरएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका केली होती. भाजपाने त्याचा इन्कार केला. टीआरएसच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपाने फार ताकदीचे उमेदवार दिलेले नाहीत, हेही विसरून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
>ओवेसींची लढत महत्त्वपूर्ण
एमआयएमचे नेते आणि असुदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरूद्दीन ओवेसी यांनी चंद्रयागुट्टा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. टीआरएसचे सहा, काँग्रेसचे दोन, भाजपचे दोन आणि एमआयएमचे १ असे ११ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हातात असून, आता कोणाच्या पारड्यात किती मते पडली आहेत, हे मंगळवारीच कळणार असल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018