1007 deaths in 24 hours; highest ever coronavirus deaths in the country | 24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी

24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी

देशातील कोरोना बाधितांच्या बरे होण्यांच्या आकड्याने 15 लाखांचा टप्पा गाठलेला असताना, या दिलाशामध्येच आता चिंताजनक आकडा येत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1000 हून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी ही आकडेवारी जारी केली आहे. 
यानुसार भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 62,064 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 1007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या संख्येमुळे देशातील एकूण मृत्यूंचा आकडा  44,386 वर पोहोचला आहे. 


जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही जवळपास दोन कोटींच्या वर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने तब्बल 22 लाखांचा टप्पा पार केला असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या ही 22,15,075 पर्यंत पोहोचली आहे. 


देशात आतापर्यंत तब्बल 15 लाखांहून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी दिली आहे. 10 राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक असून देशातील 80 टक्के रुग्ण या राज्यांमधील असल्याचंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. 24 तासांत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात आतापर्यंत 2,416,535 इतक्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती दिली आहे. देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 68.78 टक्के झाले आहे. देशातील मृत्यूप्रमाण कमी झाले असून ते 2.01 टक्के आहे. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 20,024,263 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 12,898,238 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...

संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा

बापरे! कोरोना पाठ सोडेना; निगेटिव्ह रुग्ण महिनाभरात दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती

Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 1007 deaths in 24 hours; highest ever coronavirus deaths in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.