Saudi Arabia hits Pakistan; The supply of crude oil was stopped | पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

पाकिस्तानला मे महिन्यापासून सौदी अरेबियाने कच्चे तेल देण्यास नकार दिला आहे. कारण पाकिस्तानने सौदीची 3.2 अब्ज डॉलरची रक्कम थकविली आहे. पाकिस्तानने सौदीकडून 2018 मध्ये 6.2 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. या पॅकेजनुसार सौदीकडून पाकिस्तानला 3.2 अब्ज डॉलरचे कच्चे तेल उधारीवर घेण्याची सूट होती. याची मुदत दोन महिने आधीच संपली आहे. 


एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये या बाबत 6.2 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्याबाबत नोव्हेंबर 2018 मध्ये करार झाला होता. पाकिस्तान पेट्रोलियम विभागाचे प्रवक्ते साजिद काझी यांनी सांगितले की, या कराराची मुदत संपली आहे. अर्थ विभाग या कराराच्या नुतनीकरणासाठी प्रयत्न करत आहे. सौदी अरेबियाशीही याबाबत चर्चा सुरु असून यावर उत्तराची वाट पाहिली जात आहे. 


कर्जबुडवा असा शिक्का बसलेला आणि अर्थव्यवस्था पार लयाला गेली असल्याने पाकिस्तानी आधीच संकटात आहे. आयएमएफनेही पाकिस्तानला दिलेली आर्थिक मदत रोखली आहे. सौदीच्या या पावलामुळे पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेची स्थितीही धोक्यात येणार आहे. ही बँक आता संपूर्णपणे कर्जावरच तग धरणार आहे. 


चीनकडे आशेने पाहतोय पाकिस्तान
पाकिस्तानच्या 2020-21 बजेटमधील अंदाजानुसार कमीतकमी 1 अब्ज अमेरिकी डॉलरचे तेल मिळण्याची आशा होती. हे वर्ष जुलैला सुरु झाले आहे. पाकिस्तानने सौदीकडून घेतलेल्या कर्जापैकी 1 अब्ज डॉलरचा हप्ता चार महिने आधीच दिला आहे. परंतू तिजोरीत ख़डखडाट असल्याने पाकिस्तान हे कर्ज फेडण्यासाठी चीनकडे पाहत आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...

संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा

बापरे! कोरोना पाठ सोडेना; निगेटिव्ह रुग्ण महिनाभरात दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती

Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Saudi Arabia hits Pakistan; The supply of crude oil was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.