स्लीपर वंदे भारत ट्रेनला १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांची मागणी मान्य; रेल्वेचा मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:59 IST2026-01-29T15:57:36+5:302026-01-29T15:59:33+5:30

Indian Railway Big Decision About Sleeper Vande Bharat Train: स्लीपर वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर भारतीय रेल्वे विशेष लक्ष देत आहे. तसेच प्रवाशांच्या फिडबॅकनुसार बदलही केले जात आहेत.

100 percent response to sleeper vande bharat train and passenger demand accepted indian railways big decision | स्लीपर वंदे भारत ट्रेनला १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांची मागणी मान्य; रेल्वेचा मोठा निर्णय!

स्लीपर वंदे भारत ट्रेनला १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांची मागणी मान्य; रेल्वेचा मोठा निर्णय!

Indian Railway Big Decision About Sleeper Vande Bharat Train: देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन हावडा ते कामाख्या दरम्यान सुरू झाली आहे. पहिल्या फेरीपासून स्लीपर वंदे भारत ट्रेनचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले. आता वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नियमित सेवा सुरू झाली असून, सर्व फेऱ्यांना १०० टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले जात आहे. पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, भारतीय रेल्वेने प्रवाशांची मागणी पूर्ण करत एक मोठा निर्णय घेतला आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील खान-पान सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे. त्यामुळे प्रवास आणखी आनंददायी होईल, असे म्हटले जात आहे. सकाळच्या चहासोबत नाश्ता उपलब्ध असेल. प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आयआरसीटीसीने हा निर्णय घेतला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यापासूनच पूर्ण क्षमतेने सेवा देत आहे. या प्रिमियम ट्रेनमध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर भारतीय रेल्वे विशेष लक्ष देत आहे. 

प्रवाशांकडून फिडबॅक, सोयी-सुविधांमध्ये बदल

स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून फिडबॅक घेऊन त्यानुसार भारतीय रेल्वे सोयी-सुविधांमध्ये बदल करत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सायंकाळी चहा देण्याची विनंती केली होती या मागणीच्या आधारे, भारतीय रेल्वेने या ट्रेनमध्ये सायंकाळचा चहा देण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आतापर्यंत प्रवाशांना फक्त सकाळीच चहा दिला जात होता. लोकांनी चहासोबत काही नाश्ता देण्याची मागणी केली आहे. रेल्वेने हीदेखील मागणी मान्य केली आहे. लवकरच चहासोबत नाश्ता देण्यात येणार आहे. तसेच सायंकाळच्या चहासह नॉनव्हेज जेवणाचा पर्याय दिला जाणार आहे. प्रवाशांना लवकरच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. नॉनव्हेज जेवणात बहुतेक प्रवाशांना कोणते पदार्थ आवडतील, याबाबतचा मेन्यू ठरवला जात आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.

 

Web Title : स्लीपर वंदे भारत ट्रेनों को 100% प्रतिक्रिया; रेलवे का बड़ा फैसला

Web Summary : स्लीपर वंदे भारत ट्रेनें पूरी तरह से बुक हैं। रेलवे और ऐसी ट्रेनें शुरू करेगा और यात्रियों की प्रतिक्रिया के आधार पर चाय और नाश्ते जैसी ऑनबोर्ड सेवाओं में सुधार करेगा, जिसमें शाम की चाय और मांसाहारी विकल्प शामिल हैं।

Web Title : Sleeper Vande Bharat Trains Get 100% Response; Railways Makes Major Changes

Web Summary : Sleeper Vande Bharat trains are fully booked. Railways will launch more such trains and improve onboard services like tea and snacks based on passenger feedback, including evening tea and non-veg options.