सलाम... बर्फातून वाट काढत जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:53 AM2020-01-15T11:53:25+5:302020-01-15T12:28:01+5:30

भारतीय लष्कराचे जवान आपले कर्तव्य बजावत असताना अतुलनीय शौर्यासोबतच सर्वसामान्यांना मदत करत माणुसकीही दर्शन घडवत असतात.

100 Army personnel 30 civilians walked in heavy snowfall & hospitalized pregnant Women | सलाम... बर्फातून वाट काढत जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं!

सलाम... बर्फातून वाट काढत जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं!

Next

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील कडाक्याचा हिवाळा, त्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेली हिमवष्टी, मोठ्या प्रमाणावर साचलेल्या बर्फामुले बंद झालेले रस्ते आणि विस्कळीत झालेले जनजीवन. अशा परिस्थितीत एक गर्भवती घरी अडकली होती. तिला प्रसुतीसाठीत त्वरित रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. या बिकट प्रसंगी या महिलेच्या मदलीता धावून आले ते भारतीय लष्कराचे जवान. या परिसरात तैनात असलेल्या 100 हून अधिक जवानांनी कमरेएवढ्या साचलेल्या बर्फातून चार किलोमीटरची वाट काढत या महिलेला रुग्णालयात सुखरूपपणे पोहोचवले. तिथे या महिलेने मुलाला जन्म दिला आहे. 



भारतीय लष्कराच्या चिनार कॉप्सने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. काश्मीर खोऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. त्यातच शमीमा नावाची एक गर्भवती महिला गावात अडकली होती. प्रसुतीची वेळ जवळ आल्याने तिला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र ती राहत असलेल्या गावामध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत लष्कराचे 100 जवान आणि 30 स्थानिक लोक कमरेएवढे साचलेले बर्फ तुडवत आले. त्यांनी या महिलेला स्ट्रेचरवर घेऊन रुग्णायल गाठले. तिथे या महिलेने एका मुलाला जन्म दिला. ही महिला आणि तिचे बाळ सुखरूप आहेत. 

हम से जो टकरायेगा..., देवळालीच्या फायर रेंजमध्ये तोफांचा सर्वत्र ‘प्रहार’

JNU Attack : जेएनयूवरील हल्ल्यावर काय म्हणाल? लष्करप्रमुखांनी दिले हे उत्तर

लडाख युद्धभूमी म्हणून नव्हे, तर बुद्धभूमी म्हणून नावारूपास यावी : खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल

भारतीय लष्कराचे जवान आपले कर्तव्य बजावत असताना अतुलनीय शौर्यासोबतच सर्वसामान्यांना मदत करत माणुसकीही दर्शन घडवत असतात. आज लष्कर दिन साजरा होत असतानाच भारताच्या जवानांनी बजावलेल्या कौतुकास्पद कामगिरीचे वृत्त समोर आल्याने जवानांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लष्कराच्या या जवानांचे कौतुक केले असून, उपचार घेत असलेली माता आणि तिच्या मुलाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. 



 

 

Web Title: 100 Army personnel 30 civilians walked in heavy snowfall & hospitalized pregnant Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.