शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मोठी दुर्घटना; आंध्र प्रदेशातील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळून ११ मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 15:21 IST

विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळली; ११ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये ११ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. डीसीपी सुरेश बाबू क्रेन कोसळून दुर्घटना घडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. हिंदुस्तान शिपयार्डमधील मोठी क्रेन कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दुर्घटनेवेळी जवळपास १८ मजकूर क्रेनवर काम करत होते. मंत्री अवंती श्रीनिवास यांनी घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. क्रेनमधून लोडिंग सुरू असताना दुर्घटना घडली. क्रेन खाली दबलेल्या दोन मजुरांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंनी ट्विट करून दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 'हिंदुस्तान शिपयार्डमधील मोठी क्रेन कोसळून १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समजलं. त्यावेळी तिथे ३० जण उपस्थित असल्याचं समजतं. ते सर्व सुरक्षित असावी, अशी मी प्रार्थना करतो,' असं नायडूंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश