०७... गळ... नरखेड
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:48+5:302015-03-08T00:30:48+5:30
नरखेड येथे जरी तोड स्पर्धा

०७... गळ... नरखेड
न खेड येथे जरी तोड स्पर्धाहोळीच्या पाडव्याला नरखेड येथे गळयात्रा व जरीतोड स्पर्धा आयोजित करण्याची प्रथा आहे. दरवर्षी हजारो नागरिक या गळयात्रेचा थरार अनुभवतात. यावर्षी गळी लागणारे भूमक यांची प्रकृती खराब असल्याने गळाऐवजी केवळ जरीतोड स्पर्धा पार पडली. त्यालाही उत्स्फूर्त दाद मिळाली. यानिमित्त दिवसभर गावात जल्लोषपूर्ण वातावरण होते. हा सोहळा शांततेत पार पडला. स्थानिक ज्वालागीर महाराज मठासमोरील स्मशानभूमी परिसरात दरवर्षी ही गळ यात्रा भरते. आदिवासी समाजात या यात्रेला मोठे महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक नगर परिषद प्रशासनातर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी स्मशानभूमीत नगर परिषदेतर्फे ६५ फूट उंच मनोऱ्यावर खांब बांधला जातो. त्यावर गळी लागणाऱ्या व्यक्तीला बांधून लटकविले जाते. त्यानंतर सरळ व विरुद्ध दिशेने पाच फेऱ्या मारल्या जातात. गळी लागणाऱ्याला भूमक असे संबोधले जाते. यंदा भूमक यांची प्रकृती ऐनवेळी खराब झाल्याने गळी लागण्याची प्रथा खंडित झाली. त्याऐवजी जरीतोड स्पर्धेचा थरारही नागरिकांनी यावेळी अनुभवला. ५० फुटांहून अधिक लांब असलेला सागवानाचा खांब उभारण्यात आला. या खांबाला दीड ते दोन इंच उंचीपर्यंत ग्रीसचा थर लावलेला होता. खांबाच्या वरच्या टोकाला बक्षिसाची रक्कम लटकविण्यात आली होती. अनेक स्पर्धकांनी रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रीसमुळे घसरत होते. परंपरेप्रमाणे घसरणाऱ्या व्यक्तीला आदिवासी समाजातील महिला झाडूचा मार देत होते. जुन्या काळात गुलाम राहात होते. मनोरंजनासाठी त्यांना गावाबाहेर वेशीवर नेऊन टांगले जात. मनोरंजनाच्या या माध्यमाची नंतर परंपरा सुरू झाल्याचे जाणकार सांगतात. या उत्सवाच्या आयोजनात नगर परिषद प्रशासनाचा सहभाग होता. ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. नरखेडसोबतच तालुक्यातील खरसोली व मन्नाथखेडी येथे गळयात्रा भरली होती. (तालुका प्रतिनिधी)---