शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

०६....सारांश

By admin | Updated: February 7, 2015 02:05 IST

वाळलेले झाड कोसळण्याची शक्यता

वाळलेले झाड कोसळण्याची शक्यता
खापा : स्थानिक जवाहर विद्यालय मार्गाच्या कडेला वाळलेले मोठे झाड आहे. हा मार्ग वाहतुकीचा असून, विद्यार्थ्यांचीही वर्दळ असते. सोसाट्याच्या वाऱ्याने सदर झाड कोसळून अपघात होण्याची शक्यता बळावल्याने ते झाड तोडण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.
***
कुही येथे प्रकटदिनामित्त कार्यक्रम
कुही : स्थानिक पटेल ले-आऊटमध्ये श्री संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली असून, ते बुधवारपर्यंत चालणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***
मौदा नगर स्वच्छता अभियान
मौदा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने मौदा शहरात नुकतेच नगरस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात बसस्थानक, आठवडी बाजार, पंचायत समिती कार्यालय, मुख्य रस्ता यासह अन्य भागाची साफसफाई करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छतेचे महत्त्वही पटवून देण्यात आले.
***
खतांच्या टंचाईमुळे शेतकरी त्रस्त
कळमेश्वर : तालुक्यात सध्या युरियासह अन्य महत्त्वाच्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रबीच्या पिकांना आवश्यक असलेली खते कुठून आणावी, अश प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने खते उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***
सिमेंटरोड निर्मितीसाठी निधी द्या
मेंढला : गावातील अंतर्गत रस्ते खराब होत आहेत. त्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिमेंटरोडच्या बांधकामासाठी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उपसरपंच गोपाल घोरसे, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम दंढारे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
***
नुकसानभरपाई मिळणार कधी?
नरखेड : पावसाळ्यात तालुक्यातील नदी व नाल्यालगतची शेती पुरात खरडून गेली होती. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीची शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे ही नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
***