शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्षपदाकडेही येवलेकरांचे लक्ष

By admin | Updated: March 3, 2017 00:46 IST

येवला : पंचायत समितीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने सभापतिपदी कोण विराजमान होणार याबाबत चर्चा रंगत आहेत.

येवला : पंचायत समितीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने सभापतिपदी कोण विराजमान होणार याबाबत चर्चा रंगत असून, सभापतिपद इतर मागासवर्ग महिला राखीव असल्याने अंदरसूल गणातून सेनेच्या नम्रता जगताप आणि सावरगाव गणातून आशाबाई साळवे निवडून आल्या आहेत. यापैकी कोणाची वर्णी सभापतिपदी लागणार याबाबत उत्सुकता लागून आहे.येवला पंचायत समितीत सेनेचे ७ तर राष्ट्रवादीकडे ३ सदस्य निवडून आले आहेत. सेनेकडे बहुमत असल्याने भगवा फडकणार हे निश्चित असले तरी अडीच वर्षाच्या कालावधीसाठी असणाऱ्या या पदावर प्रथम जगताप की साळवे यापैकी कोणाची वर्णी लागणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.येवल्याच्या पंचायत समिती सभापतिपदाबाबत पवार - दराडे यांना जिल्ह्याच्या राजकारणातून उसंत मिळाल्यानंतर हे दोघे येवल्याच्या सभापतिपदाबाबत निर्णय घेतील. तालुक्याच्या सभापतिपदाची संधी तालुक्याच्या उत्तरेला की पूर्वेला द्यायची? याचा निर्णय होणे बाकी आहे. आमदार छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा फटका राष्ट्रवादीच्या सत्तास्थानाला बसला. येवला पंचायत समितीवर विविध गणातील सात जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध करीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. राष्ट्रवादीला अंबादास बनकर यांनी तारले. पंचायत समितीत राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या. येवला पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदुत्ववादी पक्षाकडे सत्ता आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या पंचायत समितीत शिवसेना सत्तेवर आली आहे. शिवसेनेला अपक्ष किंवा इतर कुणाचीही मदत घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही. येवल्याला आमदार छगन भुजबळ यांच्यामुळे अंदरसूल गटातून राधाकिसन सोनवणे, तर राजापूर गटातून मायावती पगारे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळून लाल दिवा मिळाला होता. यंदा पुन्हा तिसऱ्यांदा लाल दिवा येवल्याला मिळतोय काय? यासाठीही कमालीची धावपळ चालू आहे.येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार झालेल्या भाजपासह राष्ट्रीय कॉँग्रेसला खातेदेखील उघडता आले नाही. सेना-भाजपाची युती तुटली. राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची आघाडी बिघडली. भाजपासह कॉँग्रेसची वाताहत झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेली येवला पंचायत समितीची ही निवडणूक सत्तांतर घडविणारी ऐतिहासिक ठरली.