शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला शस्त्राच्या हल्लयात युवक जखमी

By admin | Updated: October 17, 2014 00:10 IST

सातपूरला शस्त्राच्या हल्लयात युवक जखमी

नाशिक : सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथील धर्माजी कॉलनीमध्ये एका युवकावर अज्ञात सुमारे वीस जणांच्या टोळक्याने चाकुहल्ला केल्याची घटना आज (दि.१६) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तरीदेखील गंगापूररोड पोलीस ठाण्याला कुठलीही माहिती घटनास्थळावरून मिळू शकली नाही हे विशेष. चाकुहल्लयात गंभीर जखमी झालेल्या विनोद विलास जाधव (२३, रा. शिवाजीनगर, सातपुर) याला नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात आणले. त्यानंतर येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात माहिती कळविली. तोपर्यंत संबंधित पोलीस ठाणे व त्यांचे बीट मार्शल आणि गोपनिय विभाग अनभिज्ञच होते. त्यामुळे उशिरापर्यंत कुठलीही नोंद येथील पोलीस ठाण्याच्या डायरीवर होऊ शकली नव्हती. चाकु हल्लयात गंभीर जखमी झालेल्या जाधव याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली आहे.