अज्ञात वाहनाच्या धडकेत वडझिरे येथील युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 19:14 IST2018-08-30T19:13:41+5:302018-08-30T19:14:07+5:30
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील युवक ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. माळेगाव एमआयडीसी ते वडझिरे रस्त्यावर धनश्री पॅकेजिंग कंपनीजवळ बुधवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत वडझिरे येथील युवक ठार
वडझिरे : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील युवक ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. माळेगाव एमआयडीसी ते वडझिरे रस्त्यावर धनश्री पॅकेजिंग कंपनीजवळ बुधवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
वडझिरे येथील रामदास दिलीप ठोंबरे (२६) व राहुल बोडके हे दोघे युवक अॅक्टीवा मोटारसायकलने एमआयडीसीकडून वडझिरे गावाकडे जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात रामदास ठोंबरे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तर राहुल बोडके हा देखील जखमी झाला. रात्रीच्यावेळी कंपनी कामगार घरी जात असतांना त्यांना अपघातात दोघे जखमी युवक दिसले. त्यांनी
तातडीने वडझिरे येथील त्यांच्या नातेवाईकांना फोन करुन
घटनेची माहिती दिली. दोघांना सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत रामदास ठोंबरे याचा मृत्यू झाला होता. तर जखमी राहुल बोडके याच्यावर उपचार करण्यात आले.
मयत रामदास ठोंबरे हा कुटुंबातील एकुलता एक होता. सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर वडझिरे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण बदादे अधिक तपास करीत आहेत.