मुंबई-आग्रा महामार्गावर मोटारीच्या धडकेत युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 13:38 IST2018-09-06T13:34:40+5:302018-09-06T13:38:09+5:30
रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुण पादचा-याला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी (दि.४) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती.

मुंबई-आग्रा महामार्गावर मोटारीच्या धडकेत युवक ठार
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील हनुमाननगर परिसरातून ओझरकडून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या एका भरधाव मोटारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुण पादचा-याला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी (दि.४) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात युवक अशोक माधवराव कांगणे (२४,रा. अमृतधाम) याचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अशोक हा रस्ता ओलांडत असताना ओझरकडून आलेली भरधाव मोटारीने (एम.एच.१९ बीजे ५००६) जोरदार धडक दिली. या धडकेत अशोक यास डोक्यास व पायांना गंभीर दुखापत झाली होती. अज्ञात मोटारचालकाने अपघातानंतर पोलिसांना न कळविता जखमी अवस्थेतील अशोक यांना रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरुन पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी भिकाजी कांगणे (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल के ला आहे.