ट्रकच्या धडकेत धुळे येथील तरुण ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 10:53 PM2019-02-02T22:53:01+5:302019-02-02T22:53:17+5:30

मालेगाव : धुळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गौतम दिनकर सोनवणे (३४, रा. कृषिनगर, धुळे) जागीच ठार झाला आहे. सचिन देवीदास मोरे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सचिन मोरे याने ट्रकचालकाविरुद्ध छावणी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Youth killed in Dhule; One injured | ट्रकच्या धडकेत धुळे येथील तरुण ठार; एक जखमी

ट्रकच्या धडकेत धुळे येथील तरुण ठार; एक जखमी

Next

मालेगाव : धुळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गौतम दिनकर सोनवणे (३४, रा. कृषिनगर, धुळे) जागीच ठार झाला आहे. सचिन देवीदास मोरे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सचिन मोरे याने ट्रकचालकाविरुद्ध छावणी पोलिसात फिर्याद दिली आहे.
मुंबई - आग्रा महामार्गावर टेहरे बायपासजवळ शुक्रवारी मध्यरात्री सदर अपघात झाला. गौतम सोनवणे व सचिन मोरे हे दुचाकीने (क्र. एमएच १८ एएम ०३३०) धुळ्याकडे जात असताना टेहरे बायपासजवळ ट्रकचालक (क्र. यूपी ७० बीटी ६५९५) हर्षकुमार होपलाल चौधरी रा. पैकनगाव, ठाणागड, जि. रिवा (मध्य प्रदेश) याने कट मारला. यात गौतम याचा जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेला सचिन रस्त्याकडेला फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी छावणी पोलिसात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र गवंडी हे करीत आहेत. टेहरे बायपासजवळ गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: Youth killed in Dhule; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात