दुचाकी अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:22 IST2019-06-15T01:21:31+5:302019-06-15T01:22:30+5:30

जेलरोड कॅनॉलरोड गोसावी मळ्यासमोर दुचाकी स्लीप होऊन युवक गंभीर जखमी होऊन ठार झाला.

Youth killed in a bike accident | दुचाकी अपघातात युवक ठार

दुचाकी अपघातात युवक ठार

नाशिकरोड : जेलरोड कॅनॉलरोड गोसावी मळ्यासमोर दुचाकी स्लीप होऊन युवक गंभीर जखमी होऊन ठार झाला.
उपनगर रामदासस्वामीनगर येथील शिवकमल अपार्टमेंटमध्ये राहाणारा अली मोहम्मद सागर खान (३६) हा गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जेलरोड इंगळेनगर येथून
कॅनलरोडमार्गे उपनगर नाक्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होता आम्रपाली झोपडपट्टी गोसावी मळ्यासमोर दुचाकी स्लीप झाल्याने अली मोहम्मद सागर खान हा गंभीर जखमी होऊन मयत झाला.

Web Title: Youth killed in a bike accident