शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

By admin | Updated: November 15, 2016 01:37 IST

शिंगवे : पिंंजरा लावण्याची मागणी

सायखेडा : निफाड तालुक्यातील शिंगवे येथील सायखेडा-करंजगाव रस्त्यालगत राहत असलेल्या शहाजी डेर्ले यांच्या वस्तीवर त्यांचे बंधू अजय डेर्ले यांच्यावर रविवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. त्यात डेर्ले जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. परिसरातील रहिवाशांनी बिबट्या बघितल्याने त्यांनी अजय डेर्ले यांना दुध्वनीव्दारे मदतीसाठी बोलावले. डेर्ले घरातून बाहेर जात असतांना शेजारी असलेल्या मोकळ्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या मांडीला चावा घेतला. डेर्ले यांनी आरडा-ओरड केल्यानंतर बिबट्या पसार झाला. गेल्या दोन दिवसांपूर्वीच दारणासांगवी येथेही बिबट्याने सुनील साळवे यांच्या घराच्या मागे असलेल्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करीत वासरु फस्त केले. याठिकाणी वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक विजय लोंढे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. गोदाकाठ परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)