शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्त्या

By admin | Updated: July 21, 2016 00:27 IST

येवल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्त्या

 येवला : तालुक्यातील बाभूळगाव येथील एस. एन. डी महाविद्यालयात डिप्लोमाच्या प्रथम वर्षात शिकत असलेली पल्लवी बाळासाहेब ढोमसे (१७) हिने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती वसतिगृहाच्या गृहपाल (रेक्टर) डॉ. मंगल बोराडे यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात घाईने शवविच्छेदन केल्यानंतर मयत पल्लवीचा मृतदेह तिच्या गावी नेण्यात आला. मृत्यूच्या कारणाबाबत प्राथमिक संदिग्धता निर्माण झाल्याने नातेवाइकांनी कारण कळाल्याशिवाय व संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पंचकेश्वर येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री उशिरा या युवतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.येवला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात मयत पल्लवीचा अंत गळफास घेतल्याने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचे म्हटले आहे. पल्लवीचे नातेवाईक येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले असता त्यांची मनमाड पोलीस उपअधीक्षक राहुल खाडे, शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवीने आत्महत्त्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, मला येथे करमत नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. आणि मला जगण्याची इच्छा राहिली नाही. माझ्या फाशीला मीच दोषी आहे. कृपया मला माफ करा, मला जगयाचे नाही. मी गेल्यानंतर मम्मी पप्पा तुम्ही स्वत:ला सावरा. माझी आठवण काढू नका’ असे म्हटले आहे. आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीबाबत काही शंका असेल तर पुणे येथील हस्ताक्षरतज्ज्ञांकडे चिठ्ठीमधील अक्षराची पडताळणी करता येऊ शकेल, असे पोलिसांनी पल्लवीच्या नातेवाइकांना सांगितले. (वार्ताहर)