The young men of Tehera revamped the cemetery at their own expense | टेहरेच्या तरुणांनी केला स्वखर्चातून स्मशानभूमीचा कायापालट

मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील स्मशानभूमीची स्वच्छता करताना श्रीकांत शेवाळे, संजय पवार, अनिल हिरे, प्रशांत शेवाळे, संभाजी शेवाळे आदी.

मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील टेहरे येथील आझाद मित्रमंडळाने गावच्या स्मशानभूमीची साफसफाई केली. स्मशानभूमीच्या बैठक ओट्यासह आवारात लावलेल्या झाडांचा किडीपासून बचाव व्हावा यासाठी स्वखर्चातून रंगरंगोटी केली. स्मशानभूमीतील दिवे व इतर सुविधांची सुधारणा केल्याने स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे.
टेहरेची स्मशानभूमी कचरा कुंडी बनली होती. मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. अंत्यविधीसाठी येणाºया नागरिकांना याचा त्रास होत होता. हीच बाब लक्षात घेत आझाद मित्रमंडळाच्या व गावातील तरुणांनी स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी सकाळी हातात झाडू घेऊन स्मशानभूमीची साफसफाई केली.

Web Title: The young men of Tehera revamped the cemetery at their own expense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.