चुंचाळेतील तरुणाला टोळक्याकडून लोखंडी सळईने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 01:36 IST2021-09-22T01:35:27+5:302021-09-22T01:36:13+5:30
अंबड भागातील खालचे चुंचाळे येथील एका तरुणाला टोळक्याकडून लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

चुंचाळेतील तरुणाला टोळक्याकडून लोखंडी सळईने मारहाण
नाशिक : अंबड भागातील खालचे चुंचाळे येथील एका तरुणाला टोळक्याकडून लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल काशिनाथ हिवाळे (वय २३, रा. मारुती मंदिराजवळ, खालचे चुंचाळे) याला संशयित आरोपी पवन राजपूत व त्याच्या दोन मित्रांनी कुरापत काढून मारहाण केली. पवन राजपूत व त्याच्या दोन मित्रांनी अमोलला अंबासिन हॉटेलसमोरील चहाच्या टपरीवर चहा पिताना गाठून विरोधात काम करण्याचा जाब विचारीत टोकदार वस्तूने दोन्ही पायाच्या मांडीवर भोसकून दुखापत केली. तसेच लोखंडी सळईने कंबरेवर व डाव्या बाजूला मारून दुखापत करीत औद्योगिक वसाहत परिसरातून निघून जाण्याची धमकीही दिली. त्यामळे अमोल हिवाळे याने पवन राजपूत व त्याच्या दोन मित्रांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.