शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांच्या वाढीने येवलेकरांच्या उरात धडकीडोकेदुखी ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:24 IST

येवला : शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वाढती रुग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांसाठीची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येवला शहरासह तालुक्यातील २५ अहवाल एकाच दिवसात पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत १०२ बाधित ठणठणीत बरे होऊन परतले घरी

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून, तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वाढती रुग्णसंख्या प्रशासनासह नागरिकांसाठीची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येवला शहरासह तालुक्यातील २५ अहवाल एकाच दिवसात पॉझिटिव्ह आले आहेत.तालुक्यातील भाटगाव, देशमाने, नागडे, सोमठाण देश, मातुलठाण आदी गावांमध्ये कोरोनाचा नव्याने शिरकाव झाला आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांनी शंभरी ओलांडली असून, सद्यस्थितीला १६६ रुग्ण बाधित आहेत. यापैकी आजपर्यंत १०२ बाधित कोरोनामुक्त झाले असून, तालुक्यात कोरोनाबळींची संख्या ११ झाली आहे. प्रशासनासह आरोग्य विभाग कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करत आहेत. रुग्णसंख्या वाढती असली तरी तालुक्याचा रिकव्हरी रेट ७५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी सांगितले. दिवसेंदिवस येवला शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शहरवासीयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.मनमाडला १५ नवे रूग्णमनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून शनिवारी आलेल्या अहवालात पंधरा जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहरातील एकाच भागातील तेरा तर अन्य भागातील दोन जणांचा समावेश आहे.शहरात कोरोनाचे आजपर्यंत ८६ रु ग्ण आढळून आले असल्याने शहराची वाटचाल हॉटस्पॉट च्या दिशेने सुरू झाली आहे.येथील ५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३१ रु ग्णांवर कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहे.शहरात नगरपालिका प्रशासनासह पोलीस व आरोग्य यंत्रणेने आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पडणे गरजेचे असल्याचे मत शहरवासीयां कडून व्यक्त केले जात आहे. याबरोबरच शहरात आरोग्य विभागाने सर्व्हे करावा, पालिकेने कंटेन्मेंट झोन तयार करून नियमांचे कठोर पालन करावे, महसूल यंत्रणेने यावर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या