येवल्यात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:33 IST2020-08-20T22:32:11+5:302020-08-21T00:33:11+5:30
विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले.

येवला येथे डॉ. दाभोलकरांचे खुन्यांना अटक करा मागणीसाठी धरणे आंदोलन करताना कार्यकर्ते.
येवला : विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. एम. एस. कलबुर्गी हे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे अभ्यासक आणि संशोधक होते. त्यांनी अंधश्रद्धांना विरोध केला त्यामुळेच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. गौरी लंकेश या पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचासुद्धा खून करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास करणाºया एसआयटीला या चारही खुनांमध्ये समान धागा असून, परस्पर संबंध असल्याचे आढळले आहे. पण या खुनांच्या मागचा हेतू समान असून, धार्मिक मूलतत्त्ववादी या कटात सहभागी आहेत, असा आमचा विश्वास असल्याचेही सदर निवेदनात स्पष्ट करून, धरणे आदोलनात अर्जुन कोकाटे, डॉ. भाऊसाहेब गमे, अॅड. दिलीप कुलकर्णी, डॉ. अजय विभांडिक, प्रा. पुरुषोत्तम पाटील, दिनकर दाणे, अॅड. समीर देशमुख, अॅड. भाऊसाहेब आहिरे, रामनाथ पाटील, भाऊसाहेब जगताप, अक्षय गाडे, अतुल बोराडे उपस्थित होते.
विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून सात वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर, डावे विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे हत्या झाली. आपण एका बाजूला महाराष्टÑ हे पुरोगामी राज्य आहे असे म्हणतो आणि दुसºया बाजूला महाराष्टÑात पुरोगामी विचारवंतांचे खून होतात हे महाराष्टÑासाठी भूषणावह नाही, असे सदर निवेदनात म्हटले आहे.