शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

येवला : सेना-राष्ट्रवादीत खरा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 1:26 AM

उमेदवारी अर्ज माघारीनंतर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आहे.

येवला : उमेदवारी अर्ज माघारीनंतर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, एकूण ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आहे.सन २००४च्या विधानसभेत छगन भुजबळ यांनी पाय रोवल्यापासून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बंडखोरीची लागण सेना अथवा भाजप कोणालाही झाली नाही हे विशेष. येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेचे संभाजीराजे साहेबराव पवार यांच्यात प्रमुख लढत होत आहे. उर्वरित सहा उमेदवारांत बहुजन समाज पक्षाचे एकनाथ रामचंद्र गायकवाड, वंचित आघाडीचे सचिन वसंतराव अलगट, अपक्ष उमेदवार विजय दत्तू सानप, संजय पोपट पवार, सुभाष सोपान भागवत, महेंद्र गौतम पगारे यांचा समावेश आहे.विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा २६ मतदान केंद्रांची वाढ झाली असून, मतदारांची संख्यासुद्धा २१ हजारांनी वाढली आहे. सध्या मतदारसंघात एकूण ३१४ मतदान केंद्र असून, मतदारसंख्या दोन लाख ९५ हजार ८५ इतकी आहे.विधानसभा मतदारसंघात येवले तालुक्यातील १२४ आणि निफाड तालुक्यातील लासलगाव विंचूर परिसरातील ४२ गावांचा मिळून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी वाढलेली मतदारसंख्या आणि मतदान केंद्र ही कुणाच्या फायद्याचे ठरणार हे गणित मांडणे अवघड असलेतरी मतदारसंख्या वाढल्यामुळे उमेदवारांना जास्त फिरण्याची वेळ येणार आहे.तर मतदान केंद्र वाढल्यामुळे मतदारांना जास्त वेळ रांगेत राहण्याची वेळ येणार नाही असा दुहेरी फायदा झालेला दिसतो.यावेळी एका मतदान केंद्रावर 1200 ते 1500 पर्यंत मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांची वाढ गृहीत धरून मतदान केंद्रात वाढ झाल्याचेही दिसते. मतदारसंघातील पुरणगाव हे एकमेव संवेदनशील केंद्र आहे.मतदारसंघात १ लाख ५५ हजार ४४६ पुरु ष तर १ लाख ३९ हजार ६६३ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदार असून एकूण मतदारसंख्या २ लाख ९५ हजार आहे. तर अपंग मतदारांची लोकसंख्या ८२३ असून यातील ६०० पर्यंत मतदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मतदारसख्या २ लाख ७४ हजार ३३ इतकी होती. त्यावेळी मतदान केंद्र संख्या २८८ होती. मतदारांचा आकडा तीन लाखापर्यंत गेल्याने उमेदवार व कार्यकत्यांची प्रचारासाठी फेºया वाढताना दिसतील.रिंगणातील उमेदवार...एकनाथ गायकवाड (बहुजन समाज पक्ष), छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस), संभाजी पवार (शिवसेना), सचिन अलगट (वंचित बहुजन आघाडी), सुभाष भागवत (महाराष्ट्र क्र ांती सेना), महेंद्र पगारे (अपक्ष), विजय सानप (अपक्ष), संजय पवार (अपक्ष).२०१४ मध्ये होते ११ उमेदवार । यंदा आहेत एकूण ८ उमेदवार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yevla-acयेवलाChagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस