शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात ४० टक्के कांदा चाळीत पडून

By admin | Updated: August 26, 2016 21:59 IST

शासनाची संदिग्ध भूमिका : अडतीचा वरवर दिलासा; कांदा सडू लागल्याने शेतकरी चिंतित

 येवला : शेतकऱ्याची अडतीच्या जाचातून सुटका व्हावी म्हणून शासनाने अडत बंदचे धोरण अंगीकारले. शासनाने घेतलेला अडतमुक्तीचा निर्णय शेतकरी हिताचा असला तरी शासनाने पर्यायी व्यवस्था उभी न करता हा निर्णय घेतल्याने राबविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शासनाने अडतीचा निर्णय घेण्याच्या काळात कांद्याचे कोसळलेले भाव शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणत असतानाच, वरवर अडतीचा दिलासा दिसत असला तरी कांद्याची पुरती वाट लागली असून, शासनाच्या संदिग्धतेमुळे शेतकऱ्याच्या चाळीत ४० टक्के कांदा पडून आहे. भाव घसरल्याने चाळीत साठवलेला हजारो क्विंटल कांदा सडत असल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.शेतकऱ्याची अडतीच्या जाचातून सुटका व्हावी म्हणून शासनाने अडत बंदचे धोरण अंगीकारले. शासनाने घेतलेला अडतमुक्तीचा निर्णय शेतकरी हिताचा असला तरी शासनाने पर्यायी व्यवस्था उभी न करता हा निर्णय घेतल्याने राबविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या खासगी मार्केटला मनमानी चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. कांदा चाळीत सडून देण्यापेक्षा अडत परवडली असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. मार्केटला येत असलेल्या उन्हाळ कांद्याला आॅक्टोबरअखेरपर्यंत चांगले दिवस असायचे. आगामी ४० दिवसात सुट्ट्या वजा जाता २७ दिवस मार्केटचे काम चालणार आहे. शिल्लक उन्हाळ कांद्याला भाव नाही आणि उठावही नाही.बाजार समितीच्या जुन्या प्रचलित पद्धतीत मार्केट कमिटीची हमी असल्याने शेतकऱ्याची फसवणूक होत नव्हती. शासनाच्या शेतकरी हिताच्या अडत रद्द धोरणात भांडवलदार अडत्या बाजूला करताना समांतर खरेदीदार यंत्रणा शासन तयार करण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे आपला माल इतरत्र विकला तर पैसे तर बुडणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांना आहे. पारदर्शक व्यवहार, फसवणूक, पेमेंट यावर आता खाजगी ठिकाणी कोणाचेही सध्या नियंत्रण असणार नाही. शासनाने शेतकऱ्यांना आपल्या मालाची निर्धोक व खात्रीशीर विक्री करता यावी अशी कोणतीही समांतर व्यवस्था केलेली नसल्याने, अडत रद्दच्या चांगल्या निर्णयाला ग्रहण लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून शासनाने मार्ग काढला पाहिजे. आशावादी शेतकरी मात्र पुन्हा कांद्याची तयार रोपे लागवड करण्याच्या धावपळीत दिसत आहे. (वार्ताहर)