शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

यंदा गणेशमूर्ती खरेदीविना तशाच पडून

By admin | Updated: September 6, 2016 23:11 IST

आर्थिक फटका : शाडूमातीचा प्रसार, विक्रेत्यांची संख्या वाढल्याचा परिणाम

नाशिक : शहरात शाडूमातीच्या मूर्तींचा वाढलेला वापर आणि त्यातच व्रिकेत्यांची वाढलेली संख्या यामुळे अनेक व्यावसायिकांना यंदा आर्थिक फटका बसला. अनेक विक्रेते दुसऱ्या दिवशी मूर्ती तेथेच ठेवून गेल्याने पालिकेसमोर पेच निर्माण झाला. अखेरीस विनवण्या करून विक्रेत्यांना मूर्ती नेण्यास भाग पाडले.शहरात जवळपास महिनाभर अगोदरच गणेशमूर्तींसाठी स्टॉल विक्रीस प्रारंभ होत असतो. मुख्य बाजारपेठेत गणेश चतुर्थीच्या दहा ते पंधरा दिवस अगोदरच बाजारपेठ सुरू असली तरी गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठ अलीकडे गोल्फ क्लबपासून ते डोंगरे मैदान, गंगापूररोड, कॉलेजरोड, आकाशवाणी टॉवरजवळ असलेल्या बाजाराबरोबरच द्वारका ते पुणेरोडपर्यंत मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी स्टॉल्स थाटले होते. शहरात गणेशमूर्ती विक्रेत्यांची संख्या वाढतच आहे. सोमवारी सर्वत्र पारंपरिक पद्धतीने पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असली तरी शहरातील गोल्फ क्लब मैदान, द्वारका ही गणेशमूर्ती विक्री केंद्राची मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी अनेक गणेशमूर्ती तशाच पडून राहिल्याचे चित्र मंगळवारी बघायला मिळाले.पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने शाडूमातीपासून तयार होणाऱ्या गणेशमूर्ती खरेदीकडे भाविकांचा कल वाढल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना काही प्रमाणात फटका बसला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील विविध मंडळे मोठ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करतील अशी शक्यता मूर्ती व्यावसायिक बाळगून होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. उलट सार्वजनिक मंडळांनी देखाव्यांवर भर देत यंदा छोट्या आकारातील मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या आकारातील मूर्तींना फारसा उठाव मिळाला नाही, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.नाशिक शहरात पेण, मुंबई, कल्याण आदि ठिकाणाहून मूर्ती मागवण्यात आल्या होत्या तसेच शहरात नाशिकसह शहराच्या बाहेरीलदेखील व्यावसायिकांची संख्या वाढल्याने मूर्ती विक्री केंद्रांच्या संख्येतदेखील दरवर्षीपेक्षा वाढ झाल्याने ग्राहक विखुरला गेल्याचा फटकाही व्यावसायिकांना बसला. काही व्यावसायिक, तर मूर्तीसाठी कच्चा माल २०० रुपयात उपलब्ध होत असेल तर त्याबदल्यात ५०० रुपये कमविण्याच्या दृष्टीनेही गणेशमूर्ती विक्रीच्या व्यवसायात उतरू पहात असल्याने व्यावसायिकांच्या संख्येतही परिणामी वाढ होत आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस मूर्तींना भाव चढतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच अनेक नागरिक मूर्ती नोंदवून ठेवतात. त्यामुळेदेखील गणेश चतुर्थीच्या दिवशी अन्य मूर्ती विकल्या जात नाहीत.राजस्थान, अहमदाबाद, गुजरात, सुरत या ठिकाणांहून येणाऱ्या व्यावसायिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवर होत आहे. (प्रतिनिधी)